Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पहिलंच भाषण अन् सत्ताधारी पाहतच राहिले, प्रियंका गांधींनी भाजपला सोलून काढलं; एका व्यक्तीचं नाव घेताच.

पहिलंच भाषण अन् सत्ताधारी पाहतच राहिले, प्रियंका गांधींनी भाजपला सोलून काढलं; एका व्यक्तीचं नाव घेताच.
 

सगळे उद्योग, संसाधन, संपत्ती, विमानतळे, बंदरे, रस्ते, रेल्वे, सरकारी कंपन्या एकाच व्यक्तीला दिल्या जात आहेत. सरकार फक्त उद्योगपती गौतम अदानी यांच्या नफ्यावर चालत आहे, असा आरोप खासदार प्रियंका गांधी यांनी केला आहे.

वायनाडमधील पोटनिवडणुकीत जिंकून आल्यानंतर पहिल्यांदाच प्रियंका गांधी यांनी संसदेत भाषण केलं. प्रियंका गांधी यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. यावेळी प्रियंका गांधी यांनी अदानी यांचं नाव घेताच भाजपच्या खासदारांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण, ऐकण्याची मनस्थिती ठेवा, असं काँग्रेसच्या खासदारांनी सत्ताधारी पक्षातील खासदारांना सुनावलं.
प्रियंका गांधी म्हणाल्या, "संसदेत बसलेले सत्तापक्षातील खासदार भूतकाळातील गोष्टींवर चर्चा करतात. '1921 साली काय झालं? नेहरूंनी काय केले?' असा सवाल ते उपस्थित करतात. पण, वर्तमानाबद्दल सत्तापक्षातील खासदारांनी बोललं पाहिजे. देशाला सांगा, तुम्ही काय करत आहात? तुमची जबाबदारी काय आहे? की सगळी जबाबदारी जवाहरलाल नेहरू यांचीच आहे?"

"बेरोजगारी आणि महागाईच्या झळा सोसणाऱ्या जनतेला हे सरकार कोणती मदत करत आहे? कृषी कायदे उद्योगपतींसाठी बनवले जात आहेत. वायनाडपासून ललितपूरपर्यंत देशातील शेतकरी रडत आहे. आपात्कालीन स्थितीत कुठलीही मदत मिळत नाही. देशातील शेतकरी देवाच्या भरवशावर सध्या जगत आहे," असं प्रियंका गांधी यांनी सांगितलं.

"हिमाचल प्रदेशात मोठ्या उद्योगपतींसाठी कायदे बनवले जात आहेत. हिमाचलमधील सफरचंदाची शेती करणारे शेतकरी रडत आहेत. फक्त एका व्यक्तीसाठी सगळे बदलले जात आहे," अशी टीका प्रियंका गांधी यांनी अदानी यांचं नाव न घेता भाजपवर केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.