एका अल्पवयीन मुलाने शाळकरी मुलीला आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ही १२ वर्षीय मुलगी गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाविरुध्द लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने १० डिसेंबर रोजी फिर्याद दिली आहे. त्यावरून लोणीकंद पोलिस ठाण्यात १७ वर्षीय मुलाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला. अल्पवयीन मुलाने त्या मुलीला (वय १२ वर्षे चार महिने) आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
चार महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून लोणीकंद पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुध्द पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज बागल करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.