बुलढाणा : अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टीतील नुकसानीची मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या खात्यावर हा मदत निधी टाकण्यात येत होता. असे असताना देखील बनावट शेतकरी दाखवून
शासनाकडून येणारा कोट्यवधींचा निधी तलाठ्यांनी मिळून लाटण्यात आल्याचा
प्रकार बुलढाणा जिल्ह्यात समोर आला आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसानीपोटी शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येत असते. त्यानुसार अतिवृष्टी किंवा अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास शासनाकडून भरपाई देण्यात येत असते. अर्थात प्रशासनाकडून पंचनामे करून त्यानुसार शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येत असते. तर मागील वर्षी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. त्यात अनेकांच्यात शेतातील पिके वाहून गेली तर काहीच्या शेती खरडून गेल्या होत्या.
तलाठ्यांच्या कारनामा
संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत देण्यात येणार होती. यासाठी तलाठ्यांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे मागविण्यात आली होती. मात्र तलाठी उमेश बिल्लेवार, तलाठी अनंता माठे यांनी नुकसानग्रस्त बनावट शेतकरी उभे करून त्यांची नवे शासनाकडे पाठविण्याचा कारनामा केला होता. यात कोट्यवधीची अतिवृष्टीची मदत लाटल्याचे उघड झाले होते.
एका ठिकाणी बसून नुकसानीचा सर्व्हे
तलाठी उमेश बिल्लेवार, तलाठी अनंता माठे व संगणक चालक महादेव पाटील या तीन महाठगानी एका ठिकाणी बसून नुकसानीचे सर्वे करीत जे शेतकरी नाहीत; त्यांच्या नावाने कोट्यावधी रुपये शासनाकडून वसुल केले होते. दरम्यान तत्काळीन तहसीलदार शीतल सोलट यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता. यानंतर त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली होती. बुलढाणा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पाच महिन्यांपासून होते फरार
दरम्यान तिन्ही आरोपी ऑगस्ट महिन्यापासून फरार होते. मात्र चिखली तालुक्यातील रानंत्री येथून आरोपी तलाठी अनंता माठे याला ताब्यात घेतले. तर खामगाव मधून तलाठी आरोपी उमेश बिल्लेवार तर जळगाव जामोद मधून कॉम्प्युटर ऑपरेटर महादेव पाटील याला ताब्यात घेण्यात आले आहे. आता या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केल्यानंतर पुढील चौकशी सुरु आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.