Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अमित शाहांचा पेपर, शिंदेंचे कोणते नेते पास, कोण नापास? भावी मंत्र्यांची यादी समोर!

अमित शाहांचा पेपर, शिंदेंचे कोणते नेते पास, कोण नापास? भावी मंत्र्यांची यादी समोर!
 

मुंबई : मंत्रिमंडळाच्या विस्तारात मोठे बदल दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंत्रिमंडळात स्वच्छ चारित्र्याचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप नसणाऱ्या माजी मंत्र्यांनाच स्थान देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. परिणामी प्रगती पुस्तकात नापास झालेल्या काही माजी मंत्र्यांची संधी हुकण्याची शक्यता वर्तवली जातेय. शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत कुणाचा समावेश आहे? ते आता पाहूयात.

भाजपच्या परीक्षेत कोण उत्तीर्ण?

उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, राजेश शिरसागर, विजय शिवतारे आणि भावना गवळी यांचा संभाव्य मंत्र्यांच्या यादीत समावेश आहे.

भाजपच्या परीक्षेत कोण नापास?

शिवसेनेचे संजय राठोड, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार या माजी मंत्र्यांचं नाव संभाव्य मंत्र्यांच्या यादीत नसल्याचं दिसून येतंय.

मंत्रिपदासाठी कोणते निकष?
तरूण आमदारांना संधीचे संकेत
'स्वच्छ चारित्र्य, भ्रष्टाचाराचे आरोप नको'

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मंत्रिपद देताना धक्कातंत्राचा वापर केला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू झालीय. आता मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होतो, आणि कुणाला डच्चू मिळतो हे आता लवकरच स्पष्ट होईल.
अजितदादांना अर्थ नाही, एकनाथ शिंदे यांना गृह नाही!

मुख्यमंत्रीपदानंतरचं गृह आणि अर्थ खातं हे भाजपाकडेच राहणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतंय. अर्थ खात्याच्या बदल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महसूल खाते मिळणार असल्याची चर्चा आहे. तर नगरविकास खाते शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम खातंही मित्रपक्षांसाठी सोडण्याची भाजपची तयारी आहे.

वजनदार खाती महायुतीतल्या खातेवाटपात भाजपकडेच!
राज्य मंत्रिमंडळात गृह, अर्थ, महसूल, नगरविकास, जलसपंदा ही महत्वाची खाती असतात. या खात्यांपैकी वजनदार खाती महायुतीतल्या खातेवाटपात भाजपकडे राहणार असून शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे महत्त्वाची खाती जाणार नसल्याच्या चर्चेवरून विरोधकांनी टोले हाणलेत.

विस्तारात सुमारे 30 ते 35 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती महायुतीत तीन घटक पक्षांच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार? या बाबत उत्सुकता निर्माण झालीय. एकूण किती मंत्री शपथ घेणार आणि कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार? याची राजकीय वर्तुळात आहे. विस्तारात सुमारे 30 ते 35 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर आलीय. भाजपचे 20 मंत्री शपथ घेतील. तर शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. नागपूरमध्ये 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराला महत्त्व प्राप्त झालंय.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.