मिरज: येथील डॉ. बी. एस. भोसले यांच्या आशा होमिओपॅथी व कुपवाड येथील अजिंक्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मतिमंद व गतिमंद मुलांसाठी मोफत होमिओपॅथी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अजिंक्य फाउंडेशन, कवलापूर रोड, कुपवाड येथे दि. ४ जानेवारी रोजी दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिबिर होणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांना कायमस्वरूपी औषधे मोफत देण्यात येणार आहेत. या शिबिरात प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. बी. एस. भोसले व त्यांचे सहकारी मुलांची तपासणी करून त्यांना पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. मुलांमधील फिटस येणे, अतिचंचलता, ऑटिझम, डाऊन सिंड्रोम, समाजात मिक्स न होणारी मुले, आत्मविश्वास कमी असणारी मुले, योग्य वयात हालचाल न होणे, लवकर चालता न येणे, मोटर न्यूरॉन डिसीज, सेरेब्रल पालसी इत्यादी समस्यांबाबत मार्गदर्शन करून तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. पालकांनी मुलांसाठी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. बी. एस. भोसले यांच्या अशा होमिओपॅथी व कुपवाड येथील अजिंक्य फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.