पुणे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. सतीश वाघ यांची हत्या अनैतिक संबंधातून झाली असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनी या हत्येसाठी 5 लाख रुपयांची सुपारी दिली होती. हत्येची सुपारी दिल्यानंतर मारेकऱ्यांनी सतीश वाघ यांना 72 वेळा चाकूने भोसकलं, तसंच त्यांचा प्रायव्हेट पार्टही कापला. अनैतिक संबंधांतून ही हत्या करण्यात आली आहे. अनैतिक संबंधाच्या रागातून मुख्य आरोपी जावळकरने हत्येत सहभाग घेतला आहे. याप्रकरणी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
हत्येचा घटनाक्रम
9 डिसेंबरला सतीश वाघ यांनी शेवाळवाडीतून मॉर्निंग वॉकला सुरूवात केली. यानंतर हॉटेल ब्लू बेरीजवळ सतीश वाघ थांबले, तेव्हा कारमधून चौघेजण उतरले आणि त्यांनी सतीश वाघ यांचं कारमध्ये डांबून अपहरण केलं. या चौघांनी सोलापूर मार्गाच्या दिशेने कार पुढे नेली. यानंतर 9 डिसेंबरच्याच संध्याकाळी शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.