पालकमंत्र्यास पॉवर किती? पालकमंत्र्यास दरवर्षी 250 ते 500 कोटी मिळतात असे म्हटले जाते. बिड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे. तेथे शनिवारी सर्वपक्षीय मोर्चा आहे. पोलिस वाल्मिक कराडपर्यंत का पोहोचू शकत नाही?
वाल्मिक कराड प्रकरणात मुख्यमंत्री पातळीवर चर्चा सुरु आहे. आता या प्रकरणात मकोका लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. लपवालपवी होत आहे. विधान परिषदेवर असलेल्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे आहेत. एका बैठकी निमीत्त सह्याद्रीवर गेलेले धनंजय मुंडे यांनी मला बीडचे पालकमंत्री पद देता येत नसेल तर पंकजा यांनाही ते देऊ नये, फार तर आपले नेते अजितदादा यांना ते द्यावे असे सुचवले असे समजते.
मस्स्याजोगचे सरपंच संतोष देशमुख हे पंकजा मुंडे यांचे बुथ प्रमुख होते. बिड जिल्ह्याचा शस्त्र परवान्यांचा विक्रम सांगितला जातो. आता धनंजय मुंडे हे व्हिक्टीम कार्ड खेळून बचाव करु पाहताहेत. बिड डीएसपींची बदली झाली. तेथे नवा अधिकारी आला आहे. खरे म्हणजे यावर्ष अखेर आणि आणखी पंधरा दिवस हे प्रकरण तापवण्याचा प्रयत्न आहे. वाल्मिक कराडचे नाव धनंजय मुंडेंसोबत सातबारा उता-यावर दिसत आहे. या एकुण भानगडीमुळे पालकमंत्र्याला किती पैसे मिळतात? हा प्रश्न चर्चेत आला.
मुख्यमंत्री जेव्हा पालकमंत्र्याला निधी देतात त्यातून 40 ते 45 टक्के काढले जातात असे सांगितले जाते. अशा पद्धतीने 250 ते 500 कोटी रुपये पालकमंत्र्यास मिळतात असे सांगितले जाते. आता या प्रकरणात मराठा विरुद्ध ओ.बी.सी. असे वळण देण्यात येत आहे. एका सरपंचाचा खून झाल्यामुळे आरोपींना फाशी देण्याची मागणी होत आहे. यातून धनंजय मुंडे यांना मोकळे केले जाईल अशी शक्यता आ. धस यंचे सह अनेकांनी व्यक्त केली. हे प्रकरण कराड भोवती त्यासाठीच फिरवले जात आहे. मंत्री हा न्यायधिश नसतो. त्यामुळे न्यायालयात सारे सुटतील. बीडचे पालकमंत्री पद सीएम फडणवीस यांनी स्विकारावे अशी मागणि करण्यात आली आहे. या प्रकरणी खरे तर अजितदादा आणि धनंजय मुंडे या दोघांना काढावे अशी मागणी आ. संजय राऊत यांनी केली आहे. पालकमंत्र्यांचे 500 कोटी तर मुख्यमंत्र्यांचे किती? याचा जनतेने हिशेब करत रहावे. सरपंचांची हत्या होत राहील. गुन्हेगार हत्यारे फासावर चढतील किंवा शिक्षा भोगतील. मंत्र्यांचे उजवे डावे हात असणारे चेले चपाटे मोकाट फिरतील असे बिडकर म्हणताहेत. ते खरे मानायचे का?
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.