मुंबई : नवं वर्ष नवीन उत्साह घेऊन येतं, या येणाऱ्या वर्षात ग्राहकांच्या उत्साहासोबत काही महत्त्वाचे बदल होणार आहेत, त्याचा थेट परिणाम खिशावर आणि जीवनशैलीवर होणार आहे. त्यामुळे हे बदल तुम्हाला माहिती असं आवश्यक आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो बँक खाती बंद होऊ शकतात. तुमचं अकाउंट नव्या वर्षात बंद तर होणार नाही ना? कसं चेक करायचं या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते आरबीआयने सांगितलं आहे.
बँकेनं असा निर्णय का घेतला?
1 जानेवारी 2025 पासून आरबीआयने बँकिंग गाइडलाइन्समध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 3 प्रकारचे बँक अकाउंट बंद होणार आहेत. या निर्णयामुळे सुरक्षित, पारदर्शी आणि कुशल पद्धतीनं बँकिंग व्यवहार होतील, शिवाय बँक खातं हॅक करण्याच्या घटनांना आळा बसेल असा विश्वास आरबीआयने व्यक्त केला आहे. बँकिंग क्षेत्रातील डिजिटायझेशन आणि आधुनिकीकरणाला चालना देण्यासाठी या गाइडलाइन्स तयार करण्यात आल्या आहेत. बँकिंग व्यवस्थेतील रिस्क आणि उणिव कमी करणे हा या नियमांचा उद्देश आहे. यासोबतच ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानलं जात आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने, तिन्ही प्रकारची बँक अकाउंट बंद करण्यात येतील असं सांगितलं आहे. ही नेमकी कोणती अकाउंट आहेत? त्याचे नियम काय आहेत जाणून घेऊया.1. डोरमेंट अकाउंट
डोरमेंट अकाउंट हे असं अकाउंट असतं ज्यात 2 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कोणताही व्यवहार करण्यात आला नाही किंवा झाला नाही. अशी इनएक्टिव अकाउंट हॅकर्ससाठी संधी असते, त्यामुळे अशा बँक खात्याचा वापर करून हॅकर्स ग्राहकांची फसवणूक करतात, किंवा बँकेची फसवणूक करतात.
2. इनएक्टिव अकाउंट
इनएक्टिव अकाउंट ही अशी अकाउंट आहेत ज्यात ठराविक कालावधीपर्यंत कोणतेही व्यवहार खात्यावर झालेले नाहीत. ही खातीही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
3. झिरो बॅलन्स अकाउंट
ज्या खात्यांमध्ये बऱ्याच काळापासून रक्कम जमा झालेली नाही आणि ज्यांची शिल्लक रक्कम शून्य आहे अशी अकाउंट देखील बंद करण्यात येणार आहेत. ग्राहक आणि बँकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी, आर्थिक रिस्क कमी करणं, डिजिटल बँकिंगचा वापर वाढवणं, केवायसी मजबूत करणे, ग्राहकांची ओळख आणि नियमांचे पालन योग्य पद्धतीनं सुरू ठेवणं हे मुख्य हा निर्णय घेण्यामागचा उद्देश आहे.
ग्राहकांनी कोणती काळजी घ्यावी
तुमचं बँक खातं बंद असेल तर तातडीनं सुरू करा. खातं दोन वर्षापर्यंत बंद राहणार नाही याची काळजी घ्या, जर बंद झालं असेल तर तातडीनं केवायसी करून पुन्हा सुरू करा, वेळोवेळी आपल्या खात्याची KYC प्रक्रिया पूर्ण करा. आपलं बँक खातं सुरू राहील याची काळजी घ्या. बँकेनं ठरवून दिलेल्या नियमानुसार किमान रक्कम खात्यावर शिल्लक ठेवणं आवश्यक आहे. ऑफलाईन बँकिंग तर आहेत पण तुम्ही डिजिटल बँकिंगच्या सुविधेचा जास्त वापर करावा. कोणतीही शंका असल्यास तुमच्या बँकेच्या शाखेत संपर्क करू शकता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.