Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? RSS कडून 'या' नावाला पसंती; भाजप मोठ्या निर्णयाच्या तयारीत

कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? RSS कडून 'या' नावाला पसंती; भाजप मोठ्या निर्णयाच्या तयारीत


नागपूर: काल महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात महायुतीने अभूतपूर्व असे यश प्राप्त केले आहे. तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे.


महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाकडे विरोधी पक्ष नेमण्यासाठी लागते तितकेही बहुमत नसल्याचे समोर आले आहे. महायुतीने महाविकास आघाडीला 50 वरच रोखले आहे. दरम्यान , आता महायुतीच्या नवीन सरकारचा शपथविधी 25 तारखेला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे. दरम्यान आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील मुख्यमंत्रीपदाबाबत आपले म्हणणे स्पष्ट केल्याचे म्हटले जात आहे.

महायुतीच्या नवीन सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार असल्याचे म्हटल्याची चर्चा सुरू आहे. भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत असे म्हटल्याचे सांगितले जात आहे. संघ परिवार देखील फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार चालले पाहीजे यासाठी संघ परिवार आग्रही असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी , भाजपचे संसदीय मंडळ, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बैठक पार पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीचे नेते काय निर्णय घेतात हे पहावे लागणार आहे. उद्या शपथविधी होणार असल्याने यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. जर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले नाहीत तर , ते भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान संघ परिवार फडणवीस यांच्यासाठी आग्रही असल्यास भाजप काय निर्णय घेते हे पहावे लागेल.


फडणवीसांची विजयाची हॅट्ट्र्रिक

देवेंद्र फडणवीस यांनी 2014, 2019 आणि 2024 या काळात भारतीय जनता पक्षाला 100 पेक्षा जास्त जागा जिकवून दिल्या आहेत. 2014 मध्ये भाजपचे 123 उमेदवार जिंकले होते. 2019 मध्ये 105 आमदार निवडून आले होते. तर 2024 च्या विद्यमान निवडणुकीत भाजपचे मागील दोन वेळेपेक्षा जास्त उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे, आजवर सलग तीन निवडणुकीत एखाद्या पक्षाचे 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणे कोणत्याही नेत्याला शक्य झाले नाही. तर देवेंद्र फडणवीस यांनी हे शक्य करून दखवले आहे. आजच्या विज्यामुळे फडणवीस यांचे राज्याच्या राजकारणातील वजन नक्कीच वाढलेले पाहायला मिळत आहे. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.