Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोणत्या वयात किती प्यावी दारू, Liver नाही सडणार; काय सांगतात तज्ज्ञ

कोणत्या वयात किती प्यावी दारू, Liver नाही सडणार; काय सांगतात तज्ज्ञ
 

तुम्ही अल्कोहोलचे सेवन करत असाल आणि तुमच्या आरोग्यासाठी किती प्रमाणात अल्कोहोल चांगले आहे याची काळजी वाटते आहे का? जर हो असं उत्तर असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. होय, अलीकडेच वय, लिंग आणि भौगोलिक क्षेत्र यांसारख्या घटकांच्या आधारे अल्कोहोलच्या परिणामावर एक अहवाल देण्यात आला आहे. द लॅन्सेट जर्नलने एका अभ्यासाच्या आधारे हा अहवाल प्रथमच प्रकाशित केला आहे. या संशोधनात असे विश्लेषण करण्यात आले आहे की, एखादी व्यक्ती त्याच्या वयानुसार किती प्रमाणात मद्यपान करू शकते आणि किती प्रमाणात सेवन केल्याने त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. 

 

द लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका नवीन विश्लेषणानुसार, तरुण व्यक्तींच्या मद्यपानामुळे वृद्धांपेक्षा आरोग्याला जास्त धोका निर्माण होतो. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजचे एनालिसिस जिओग्राफिक हा क्षेत्र, वय आणि लिंगानुसार अल्कोहोलच्या संपर्कात येण्याच्या जोखमीचा अहवाल देणारा पहिला अभ्यास आहे. या अभ्यासात, शास्त्रज्ञांनी 204 देशांमध्ये अल्कोहोलच्या वापराचे विश्लेषण केले आहे. ज्यामध्ये शास्त्रज्ञांना आढळले की 2020 मध्ये 1.34 कोटी लोकांनी (1.03 कोटी पुरुष आणि 0.312 कोटी महिला) हानिकारक प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केले आहे.

40 वयापेक्षा कमी पुरुषांमध्ये अधिक धोका

विश्लेषणातून असे दिसून आले आहे की जगभरात, 15 ते 39 वयोगटातील पुरुषांना मद्यपानाचा सर्वाधिक धोका आहे. प्रत्येक भौगोलिक प्रदेशात, या वयोगटातील पुरुष लोकसंख्येचा सर्वात मोठा भाग आहे जे असुरक्षित प्रमाणात मद्यपान करतात. संशोधकांच्या मते, या लोकसंख्या आणि वयोगटातील लोकांमध्ये दारू पिण्याचे कोणतेही आरोग्य फायदे नाहीत. दारूमुळे या व्यक्तींना केवळ त्रासच होतो आणि धोका निर्माण होतो.
काय सांगते टक्केवारी

संशोधकांनी सांगितले की सुमारे 60 टक्के अल्कोहोल पिण्यानंतर अपघात या वयोगटातील लोकांमध्ये होतात, ज्यात मोटार वाहन अपघात, आत्महत्या आणि खून यांचा समावेश होतो. 2020 मध्ये, असुरक्षित प्रमाणात मद्य सेवन करणाऱ्यांपैकी 59.1 टक्के लोक हे 15 ते 39 वयोगटातील लोक होते, विशेष म्हणजे त्यापैकी 76.7 टक्के पुरुष होते.

या अहवालानुसार, 2020 मध्ये भारतात 15-39 वर्षे वयोगटातील लोकांमध्ये 1.85 टक्के महिला आणि 25.7 टक्के पुरुषांनी असुरक्षित प्रमाणात मद्यपान केले होते. हे 40 ते 64 वयोगटातील 1.79 टक्के महिला आणि 23 टक्के पुरुषांपेक्षा कमी होते ज्यांनी असुरक्षित प्रमाणात मद्यपान केले होते.

संशोधनानुसार किती मद्यपान करावे
संशोधनानुसार, एखाद्या व्यक्तीचे आरोग्य अत्यंत धोक्यात येण्याआधी मद्यपान केलेल्या प्रमाणाची तुलना दारू न पिणाऱ्या व्यक्तीशी केली जाऊ शकते. या संशोधनात कोणत्या वयोगटातील लोकांसाठी किती प्रमाणात अल्कोहोल योग्य असेल याचाही अंदाज घेण्यात आला आहे.

संशोधनानुसार, 15 ते 39 वयोगटासाठी हे दररोज 0.136 इतकी दारू पिणं हे स्टँडर्ड असू शकते. त्याच वेळी, या वयोगटातील महिलांसाठी हे स्टँडर्ड ड्रिंक दररोज 0.273 आहे. 40-64 वयोगटातील निरोगी लोकांसाठी सुरक्षित अल्कोहोल सेवन पातळी दररोज सुमारे अर्धा स्टँडर्ड ड्रिंक (पुरुषांसाठी 0.527 पेये आणि महिलांसाठी 0.562 पेये) पासून दररोज सुमारे दोन स्टँडर्ड ड्रिंक (पुरुषांसाठी 1.69 पेये आणि महिलांसाठी 0.562 पेये) पर्यंत असतात. 1.82 पर्यंत अल्कोहोल पिण्याची शिफारस केली जाते.

65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांसाठी दररोज तीनपेक्षा जास्त स्टँडर्ड ड्रिंक (पुरुषांसाठी 3.19 पेये आणि महिलांसाठी 3.51 पेये) शिफारस केलेली नाहीत. संशोधकांच्या मते, एक स्टँडर्ड ड्रिंक म्हणजे 10 ग्रॅम शुद्ध अल्कोहोल सांगण्यात आले आहे. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.