Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ

एकीकडे मतदान केंद्राबाहेर EVM मशीन हॅकिंगसाठी राऊटर? दुसरीकडे 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
 

ज्यात 10 हजार किलो चांदीच्या विटा सापडल्या, असून त्याची किंमत 94 कोटी 68 लाख असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, एकीकडे नवी मुंबईत नेरुळ मधील शिवाजी नगर तुर्भे येथे गाडीत राऊटरचे सामान मिळाले आहे. तर दुसरीकडे, धुळ्यात 94 कोटी 68 लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ उडाली आहे.

 
नेरुळ मधील शिवाजीनगर मतदान केंद्रावर एका गाडीत काही इंटरनेटचे राऊटर आढळे आहेत. काही हँकिंगचं सामान असल्याचे दिसत आहे. हे कोणी आणि कशासाठी आणले होते. याचा तपास तुर्भे पोलीस करत आहेत, गाडी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

संबधीत सामान इव्हीएम मशीन हॅकींगसाठी आणले आहे का याची राजकीय पक्षांना शंका होती, मात्र सापडलेले सामान हे शिवाजी नगर मधील मोबाईल टॅावर योग्य रित्या सुरू आहेत का हे चेक करणारी सिस्टम असल्याची पोलीसांनी माहिती दिली. दुसरीकडे, शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांनी एका कंटेनरची तपासणी केली. सदरचा माल हा एचडीएफसी बँकेचा असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांकडून या मालाची चौकशी सुरू आहे..


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.