नवलाख उंब्रे येथील प्रसिद्ध बैलगाडा मालकाचे अपहरण करून खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि. २१) उघडकीस आली. खुनामागे खंडणी आणि अन्य देखील काही कारण असल्याचे सांगितले जात आहे. मात्र खुनाचे नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पंडित रामचंद्र जाधव (वय ४८, रा. जाधववाडी, नवलाख उंब्रे, ता. मावळ, पुणे) असे खून झालेल्या बैलगाडा मालकाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, पंडित जाधव यांचे १४ नोव्हेंबर रोजी खंडणीसाठी अज्ञातांनी अपहरण केले. त्यानंतर आरोपींनी ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. दरम्यान आरोपींनी जाधव यांचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला.या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने सुरज वानखेडे याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून केला जात आहे. पंडित जाधव यांच्याकडे मॉगी नावाचा बैल आहे. त्याने अनेक शर्यतीमध्ये मैदान मारले आहे. त्यामुळे जाधव यांचा पंचक्रोशीत लौकिक होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.