विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाबाबत अनेक बातम्या समोर आल्या आहे. या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात असून लवकरच दोघांचा घटस्फोट होईल अशी, चर्चाही रंगली आहे. आता पुन्हा एकदा या दोघांच्या
घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. अभिषेक बच्चनने असं काही केलंय,
ज्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना हवा मिळाली आहे.
अभिषेक बच्चनकडून घटस्फोटावर शिक्कामोर्तब?
अभिनेत्री ऐश्वर्या रायचा नुकताच वाढदिवस झाला. ऐश्वर्याने वाढदिवस उत्साहात सेलिब्रेट केला. तिचे कुटुंबीय, मित्र परिवारासह अनेक सेलिब्रिटींनी ऐश्वर्याला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. पण, अभिषेक बच्चनने ऐश्वर्याला शुभेच्छा दिल्या नाहीत किंवा तशी पोस्टही केली नाही. इतकंच काय तर बच्चन कुटुंबानेही ऐश्वर्या रायला तिच्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या नाहीत.
ऐश्वर्या रायच्या वाढदिवशी केलं असं काही की...
सर्वसाधारणपणे, सेलिब्रिटी त्याच्या पार्टनर किंवा मित्रमंडळीच्या वाढदिवशी सोशल मीडियावर खास पोस्ट करत शुभेच्छा देतात. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या पार्टनरच्या वाढदिवशी रोमँटिक पोस्ट करतात. ऐश्वर्या रायचा 1 नोव्हेंबरला वाढदिवस होता. पण, या दिवशी तिचा पती अभिषेक बच्चन याने तिला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या नाहीत. त्यामुळे अभिषेक याने घटस्फोटाच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.
अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांबाबत अद्याप बच्चन कुटुंब किंवा ऐश्वर्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण, अनेक मोठ्या कार्यक्रमांमध्ये ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंब एकमेकांपासून दूर पळताना दिसले. मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नातही ऐश्वर्या आणि अभिषेक पोहोचले होते, पण हे कपल एकत्र दिसलं नाही. यानंतर अभिषेकने सोशल मीडियावर घटस्फोटासंबंधित एक पोस्ट लाईक केली होती. यानंतर दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी जोर धरला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.