Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खोतवाडी - वाजेगावात पृथ्वीराज पाटील यांची प्रचार पदयात्रा संपन्न..पृथ्वीराजबाबांचा हातच निवडून येणार-- गावकऱ्यांचा ठाम निर्धार

खोतवाडी - वाजेगावात पृथ्वीराज पाटील यांची प्रचार पदयात्रा संपन्न.. पृथ्वीराजबाबांचा हातच निवडून येणार -- गावकऱ्यांचा ठाम निर्धार
 

सांगली दि.१७: खोतवाडीच्या दक्षिणेला पावसाळ्यात चार महिने ओढा भरुन व्हायचा..मिरज सांगलीकडे दवाखान्याला जायची पंचायत, लेकरांची शाळा बुडवायची, पै पाहुणे यायचे बंद अशा बिकट काळात पृथ्वीराज पाटील यांनी पावणे दोन कोटीचा पूल उभा करुन लई उपकार केले आहेत. त्यांनाच आमदार करणारच अशा भावना खोतवाडी व वाजेगाव प्रचार पदयात्रेत गावकरी व्यक्त करीत पृथ्वीराजबाबा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, काँग्रेस पक्षाचा महाआघाडीचा विजय असो अशा घोषणा देत होते. पृथ्वीराजबाबा व ऋतुराज पाटील हे हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन करीत होते. पृथ्वीराजबाबा निवडून यावेत म्हणून महिला त्यांचे औक्षण करून विजयाचा आशीर्वाद देत होते.

खोतवाडी स्टँड समोर पृथ्वीराज पाटील यांनी नारळ फोडून पदयात्रेचा प्रारंभ केला. स्टँड - शिंदे गल्ली -, मारुती मंदीर - पाटील गल्ली - माळ हात - मुळीक गल्ली - नवीन प्लाॅट अशी करत पदयात्रा वाजेगावात मुख्य रस्त्यावरुन संपन्न झाली. यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, 'गेल्या वेळी थोडक्यात संधी हुकली. खोतवाडी वाजेगाव व परिसरातील गावांनी चांगले लिड दिले होते. त्या ऋणातून थोडी फार उतराई होण्यासाठी पावणे दोन कोटीचा पूल महाविकास आघाडी सरकारच्या काळात पूर्ण केला. पाच वर्षे तुमच्यासाठी राबलोय आता पाच वर्षे तुमच्यासाठी द्या. हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून द्या. ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी नागरिकांनी हात निवडून देण्याचा निर्धार केल्याचे सांगितले.
पदयात्रेत जयकर शिंदे, दशरथ मुळीक, वसंत सुर्यवंशी, योगेश पाटील, श्रीकांत पाटील, माणिक कालेकर, विजय पाटील, संजय व आशिष सुर्यवंशी, अनिल, महादेव व पांडुरंग शिंदे,सुरेश मुळीक, महादेव मोरे, प्रशांत साळुंखे, राजेश खामकर,वाजेगावचे धनंजय मोहिते,सरपंच दिपक खराडे, उपसरपंच रामभाऊ, भिकाजी व अनिल पाटणकर, अनंत पवार, ग्रामस्थ व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.