महाविकास आघाडी आणि महायुती दोघांचीही बंडखोरांनी डोकेदुखी वाढवली आहे. बंडखोरी रोखण्यासाठी दोन्हीकडून बंडखोर उमेदवारांना समजवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने भेटीगाठी वेगाने सुरु झाल्या आहेत.
सांगली विधानसभा निवडणुकीत ट्विस्ट वाढणार असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस बंडखोर जयश्रीताई पाटील यांना पाठिंबासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना साकडे घालण्यात आले आहे. काँग्रेस बंडखोर उमेदवार जयश्रीताई पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील व जयश्रीताई पाटलांच्या मुलगी सोनिया होळकरांनी मनोज जरांगेंची अंतरवाली सराटीत भेट घेतली आहे.
यावेळी प्रतीक पाटील यांच्यासोबत माजी खासदार राजू शेट्टी देखील बैठकीला उपस्थित होते. जयश्रीताई पाटलांना सांगली विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती त्यांनी मनोज जरांगे यांना केली आहे.
सांगलीमध्ये जयश्रीताई पाटलांची एकीकडे विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांनी भेट घेतली आहेत. दर विशाल पाटलांचे मोठे बंधू माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटलांनी मनोज जरांगेंची भेट घेत जयश्रीताई पाटलांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे लोकसभेनंतर विधानसभेतही सांगली पॅटर्नची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.