कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीचा एकही उमेदवार विजयी झाला नसल्याचे समोर आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या दहा उमेदवारांचा पराभव झाला आहे.
सातारा जिल्ह्यातही महाविकास आघाडीचा एकही उमेदवार विजयी झालेला नाही. सातारा जिल्ह्यात महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा पराभव झाला आहे, कराड दक्षिणमध्ये भाजपाच्या अतुल भोसले यांनी ३९ हजार १७९ मतांनी चव्हाण यांचा पराभव केला आहे. तर कराड उत्तरमध्ये भाजपाच्या मनोज घोरपडे यांनी विजय खेचून आणला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बाळासाहेब पाटील यांचा ४२ हजार ६९९ मतांनी पराभव केला आहे.
कराड दक्षिण- अतुल भोसले (भाजपा)
कराड उत्तर- मनोज घोरपडे (भाजपा)
कोरेगाव- महेश शिंदे ( शिवसेना)
वाई- मकरंद जाधव ( राष्ट्रवादी)
फलटण - सचिन पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस)
सातारा- शिवेंद्रराजे भोसले ( भाजपा)
पाटण - शंभूराज देसाई, (शिवसेना)
माण - जयकुमार गोरे, (भाजप)
कोल्हापूर जिल्ह्यातील निकाल
कोल्हापूर दक्षिण- अमल महाडिक ( भाजपा)
कोल्हापूर उत्तर-राजेश श्रीरसागर (शिवसेना शिंदे गट)
हातकणंगले- अशोकराव माने (जनसुराज्य शक्ती पक्ष)
शाहुवाडी- विनय कोरे ( जनसुराज्य शक्ती पक्ष)
इचलकरंजी- राहुल आवाडे ( भाजपा)
चंदगड- शिवाजी पाटील ( अपक्ष)
शिरोळ- राजेंद्र यड्रावकर
करवीर- चंद्रदीप नरके
राधानगरी- प्रकाश आबिटकर
कागल- हसन मुश्रीफ ( राष्ट्रवादी काँग्रेस)
सांगली जिल्ह्यातील निकाल
इस्लामपूर- जयंत पाटील ( राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
मिरज- सुरेश खाडे ( भाजपा)
शिराळा- सत्यजीत देशमुख ( भाजपा)
विटा- सुहास बाबर ( शिवसेना)
पलूस- विश्वजीत कदम (काँग्रेस)
जत - गोपीचंद पडळकर ( भाजपा)
तासगाव- रोहित पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
सांगली - सुधीर गाडगीळ ( भाजपा)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.