Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सोमय्या दांपत्याचा नवा कारनामा, नातेवाईक वृद्ध महिलेला धमकावून कोट्यवधींची मालमत्ता हडपण्याचा डाव

सोमय्या दांपत्याचा नवा कारनामा, नातेवाईक वृद्ध महिलेला धमकावून कोट्यवधींची मालमत्ता हडपण्याचा डाव
 

भाजप नेते किरीट सोमय्या व पत्नी मेधा सोमय्या यांनी मुंबई, पुणे, अलिबाग, देवगड येथील कोटय़वधी रुपयांची मालमत्ता हडपण्यासाठी रचलेले कारस्थान उजेडात आले आहे. सोमय्या दांपत्य व इतरांनी अंधेरी येथील नातेवाईक वृद्ध महिलेच्या पतीचे मृत्युपत्र व मालमत्तेची इतर कागदपत्रे बळकावून तसेच वृद्धेला धमकी देऊन पैशांची अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी जुहू पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्यानंतर वृद्ध महिलेच्या मुलाने मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

 

मेधा सोमय्या, किरीट सोमय्या, अन्वया पैंगणकर, किरण पैंगणकर यांच्याविरुद्ध फसवणूक, खंडणी, गुन्हेगारी धमकी, पुरावे नष्ट करणे, दस्तऐवज लपवणे आदी आरोपांखाली गुन्हा दाखल करा, अशी विनंती वृद्ध महिलेचा मुलगा आशीष करंदीकर यांनी पोलीस आयुक्तांना केली आहे. सोमय्या दांपत्य व इतरांनी माझे वडील रघुनाथ करंदीकर यांच्या नावावरील मालमत्ता हडप करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो असता तेथील महिला पोलीस निरीक्षकांनी तक्रार लिहून घेण्यास नकार दिला. गैरव्यवहारात मेधा सोमय्या यांचा सहभाग असल्यामुळेच जुहू पोलिसांनी तक्रार घेतली नाही, असा आरोप आशीष करंदीकर यांनी केला आहे. गैरव्यवहारप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी विनंती पोलीस आयुक्तांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

तक्रार दाराच्या जिवाला धोका

मालमत्ता हडप करण्याच्या कारस्थानाविरुद्ध तक्रार करणारे आशीष करंदीकर यांनी त्यांच्या जिवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी अनोळखी व्यक्तींनी आपला पाठलाग केला. अशा प्रकारे कागदपत्रांवर सह्या करून घेण्यासाठी किरण पैंगणकर यांच्याकडून बळजबरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप आशीष करंदीकर यांनी केला आहे.

 

नेमके प्रकरण काय?

तक्रारदार आशीष करंदीकर यांच्या वडिलांनी केलेले मृत्युपत्र, हिंदू एकत्रित कुटुंब पद्धत व त्यासंबंधित सर्व कागदपत्रे लपवून ठेवण्यात आली आहेत. ही कागदपत्रे किरण पैंगणकर यांच्याकडे असून त्याआधारे विविध ठिकाणच्या मालमत्ता बळकावण्यासाठी वृद्ध महिला अनघा (आशीष यांच्या आई) यांच्यावर दबाव आणला जात आहे. तसेच कुलमुखत्यारपत्र लिहून देण्यासाठी आशीष यांना धमकी दिली जात आहे, असे आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.