आदिवासी मुलींच लग्न मुस्लिमांसोबत लावून देणाऱ्याला मारून टाका, सरपंचाच वादग्रस्त वक्तव्य
राजस्थान : आदिवासी मुलींचे लग्न मुस्लिमांसोबत लावणाऱ्याला मारले पाहिजे, असे वादग्रस्त विधान सरपंच कांतीलाल यांनी एका सभेत केले आहे. इतकच नाही तर सरपंच कांतीलाल यांनी भारत आदिवासी पक्षाच्या धोरणांचा खरपूस समाचार घेत आदिवासी समाजातील मुलींना मुस्लिम समाजात लग्न करू देऊ नये, असे आवाहन देखील केले आहे.त्यामुळे पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.
सोमवारी पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी चौरासी विधानसभेच्या वेलमध्ये भाजपची जाहीर सभा पार पडली होती. या जाहीर सभेत मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी भाजप उमेदवार करीलाल नानोमा यांच्यासाठी पाठिंबा मागितला होता. तसेच सरपंच कांतीलाल यांनी भारत आदिवासी पक्षाच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला होता.
यावेळी जाहीर सभेतून बोलताना सरपंच कांतीलाल म्हणाले की, "भारत आदिवासी पक्षाचे खासदार राजकुमार रोट यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी आदिवासी मुलींचे लग्न मुस्लिम समाजातील मुलींशी लावावे, असे विधान केले होते. अशा आदिवासी समाजाची दिशाभूल करणाऱ्या लोकांना मारले पाहिजे, असे कांतीलाल यांनी सभेत म्हटले आहे. तसेच भारत आदिवासी पक्षाच्या धोरणांचा खरपूस समाचार घेत आदिवासी समाजातील मुलींना मुस्लिम समाजात लग्न करू देऊ नये, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.खरं तर राजकुमार रोट हे भारतीय राजकारणात आदिवासी समाजाचा आवाज बुलंद करणारे प्रमुख आदिवासी नेते आहेत. ते राजस्थानच्या चौरासी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत आणि बांसवाडा-डुंगरपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे सदस्य आहेत. याच खासदार राजकुमार रोत यांनी आदिवासी मुलींना मुस्लिम समाजात लग्न करण्याचा सल्ला दिल्याचा आरोप सरपंच कांतीलाल यांनी केला होता.त्यांनी याला विरोध करत आदिवासी समाजातच मुलींचे लग्न लावून देणार असल्याचे सांगितले.
या आरोपानंतर खासदार राजकुमार रोत यांनी सरपंच कांतीलाल यांच्या विधानाचे खंडन केले आहे.तसेच ते म्हणाले - "मी असे विधान केले नाही". त्यांनी भाजप समर्पित सरपंच कांतीलाल यांच्या विधानाला विरोध करत भाजपने आचारसंहितेचा भंग केला आहे, त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान चौरासी विधानसभा पोटनिवडणुकीच्या शेवटच्या प्रचाराच्या दिवशी बापचे अनिल कटारा आणि भाजपचे करीलाल नानोमा यांच्यात थेट लढत आहे. काँग्रेसचे उमेदवार महेश रोट यांच्यासाठी कोणताही मोठा नेता पुढे आला नाही. बाप आणि भाजपमधील शाब्दिक हल्ले तीव्र झाले असून, दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात वक्तव्ये करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.