सांगली : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. आता राज्यातील विविध राजकीय पक्षांकडून बंडखोरी करणाऱ्या नेत्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेस समोर देखील बंडखोर नेत्यांचं मोठं आव्हान आहे.
काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याकडून बंडखोर नेत्यांशी संपर्क साधून अर्ज माघारी घेण्यासंदर्भातील सूचना केल्या जात आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली विधानसभा मतदारसंघात देखील काँग्रेसपुढं मोठं आव्हान आहे. कारण, काँग्रेसनं इथं पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, जयश्री पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्यास नकार दिला आहे. काँग्रेसनं दिलेली विधानपरिषदेची ऑफर त्यांनी नाकारली आहे.
सांगली विधानसभेत काँग्रेसमध्ये बंडखोरी कायम आहे. जयश्री पाटील विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. काँग्रेसकडून आलेली विधान परिषदेची ऑफर जयश्री पाटील यांनी नाकारली आहे. सांगली विधानसभेमध्ये काँग्रेस मधून बंडखोरी कायम असून जयश्री पाटील या विधानसभा निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. 5 तारखेला त्या काँग्रेस कमिटी पासून प्रचाराला शुभारंभ करणार आहेत. जयश्री पाटील यांनी बंडखोरी मागे घ्यावी, यासाठी काँग्रेसचे प्रभारी चेन्नीथला यांनी प्रयत्न केले होते.
जयश्री पाटील यांना विधान परिषदेची देखील ऑफर देण्यात आली होती. परंतु, जयश्री पाटील यांनी विधान परिषदेची ऑफर नाकारली असून त्या विधानसभा निवडणूक लढण्यावर काम आहेत. तसेच खासदार विशाल पाटील देखील माझ्यासोबत असल्याचा निर्वाळा जयश्री पाटील यांनी दिलाय. जयश्री पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे पाकीट चिन्ह मागितलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांनी पाकीट चिन्हावर निवडणूक लढवून विजयी झाले होते. त्यामुळे जयश्री पाटील यांनी देखील पाकीट चिन्ह मागितलं आहे. त्यामुळे सांगलीमध्ये पुन्हा सांगली पॅटर्न पाहायला मिळणार आहे.
सागंलीत तिरंगी लढत?
सागंली विधानसभा मतदारसंघात आता भाजपचे सुधीर गाडगीळ, काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील आणि अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्यात लढत होईल. त्यामुळं या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसकडून सांगलीच्या जागेवरील उमेदवार पहिल्या यादीत जाहीर करण्यात आला नव्हता.भाजपमधून उमेदवारी न भेटल्याने शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी नाराज होत आपला अपक्ष उमेदवार अर्ज भरला आहे. काँग्रेसमधून उमेदवारी न भेटल्याने जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरत प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. भाजपला त्यांचे अपक्ष उमेदवार शिवाजी डोंगरे यांची समजूत काढण्यात यश येतं का पाहावं लागेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.