Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजित पवार यांनी धक्के मारुन शरद पवारांना बाहेर काढलं : जितेंद्र आव्हाड

अजित पवार यांनी धक्के मारुन शरद पवारांना बाहेर काढलं : जितेंद्र आव्हाड
 

ठाणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार पडेल. त्यामुळे राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन होणार की पुन्हा महायुती सरकार येणार याची उत्सुकता लागली आहे.

या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी शाब्दिक चकमक सुरुच आहे. यातच आता शरद पवार गटाच्या नेते जितेंद्र आव्हाड यांनी
अजित पवार गटाला पाकिटमार टोळी असे म्हटले आहेत.

 

शरद पवार गटाचे नेते, मुंब्रा-कळव्यांचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी अनेकदा अजित पवार यांच्यावर टीका करताना दिसतात. ठाण्यातील चंदननगर मुंब्रा या ठिकाणी आयोजित केलेल्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर आरोप केला आहे. 'अजित पवारांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी नवं चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी' अशी टीका आव्हाड यांनी केली.

अजित पवार यांनी हिंमत असेल तर नवं चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी, असं जितेंद्र आव्हाड यांनी केली. राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा होता पण एके दिवशी अजित पवार येतात आणि धक्के मारून शरद पवारांना बाहेर काढतात. जाताना त्यांच्याकडील घड्याल देखील हिसकावून नेतात. ही चोरांची टोळी आहे, अशी टीका आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर केली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आणि आर्थिक सहाय्यता देण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यात महंगाई वाढली त्यात सरकारची तिजोरी देखील रिकामी बदलापुर हत्याकांडावर भाजपा सरकारच्या धोरणांवर कठोर टीका केली. मतदात्यांना जागरूक राहून जुल्मी विरोधी लढाईत सहभागी होण्याचं आवाहन जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे.

 

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेला अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुरज चव्हाण म्हणाले की, पराभव समोर दिसत असल्याने जितेंद्र आव्हाड यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यांना लोकशाही मान्य नसल्यामुळे त्यांनी असं वक्तव्य केलं असावं.

पक्ष ही कोणताही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, तर लोकांनी निर्माण केलेलं संघटन आहे. निवडणूक आयोगाने घड्याल चिन्ह अजित पवार यांना दिलं आहे. लोकांनी अजित दादांचं नेतृत्तव स्विकारलेलं आहे. आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत आहेत. प्रसिद्धी झोतात येण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केलं, असं सूरज चव्हाण म्हणाले.


 

 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.