Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पवार म्हणतात महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय; सदाभाऊ म्हणाले, महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?

पवार म्हणतात महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय; सदाभाऊ म्हणाले, महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?
 

महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार येणार आहे. जत विधानसभामधील विजय मोठा असणार आहे. गोपीचंद पडळकर  यांना माणूस विधानसभामध्ये पाठवायचा आहे. विरोधक कुंभकर्णच्या अवस्थेत गेला पाहिजे, असा गोपीचंद पडळकर यांचा विजय करा, असं सदाभाऊ खोत  म्हणाले. तसेच यावेळी सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. जत विधानसभेतील भाजपचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ आज महायुतीकडून जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी सदाभाऊ खोत बोलत होते.

सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले?

शरद पवार असतील उद्धव ठाकरे असते, काँग्रेसवाले असतील यांनी देवेंद्र फडणवीसांना का घेरायला लागली आहेत माहीतय का?, कारण आपण शेतकरी माणसं आहोत. आपल्या घरात गाय असते. राज्याची तिजोरी म्हणजे ही गाय आहे. गायीची जी कास आहे, त्या कासला चार थानं आहे, यामधील अर्धथानं वासऱ्याला पाजायचं (म्हणजे आपल्याला) आणि साडेतीन थानातलं दूध आपणचं हाणायचं. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले ही चारही थानं मी वासरांनाच देणार...यानंतर शरद पवारांना नववा महिना लागला...पवारसाहेब म्हणाले, आता माझ्या चिल्ल्यापिल्ल्यांचं कसं होणार?, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?; सदाभाऊ खोत यांचा सवाल

शरद पवारांनी बँका हाणल्या, कारखाना हाणाला, पण येवढं हाणलं तरी शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे...मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. अरे कसला चेहरा...महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला. तसेच गावातील नागिकांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचे कोणी काम केले असेल, ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी...असंही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

गोपीचंद पडळकर म्हणजे महाराष्ट्रची मुलूख मैदान तोफ आहे. बाकीच्या लोकांकरता हा जत मतदारसंघ शेवटचा असेल, पण माझ्यासाठी हा एक नंबरचा मतदार संघ आहे. जत विधानसभा हा महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहेच पण माझा गोपीचंद या जतमधून विधानसभा लढवत आहेत. गोपीचंद पडळकरांना या निवडणुकीत निवडून द्या...जतचा विकास करून जत एक नंबरवर नेतो, असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं. काही लोकांनी जतचा दुष्काळ पुसण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. जत तालुक्यातील 64 गावातील दुष्काळ आपण नेहमीसाठी भूतकाळ करायचं ठरवलं आहे. या गावांमध्ये बागायती शेती लवकरच होईल. मी मुख्यमंत्री होणे अगोदर या सिंचन योजना बंद होत्या. टेंभू उपसा सिंचन योजनाला 7 हजार 370 कोटी रुपये आपण दिले. यामुळे सांगली जिल्ह्यात दोन लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आली. उपसा सिंचन योजनांना सौर ऊर्जा देण्याचा आता निर्णय घेतलाय. त्यामुळे विज बिल भरावे लागणार नाही , याचा पहिला प्रयोग म्हैसाळ योजनेवर केलाय, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.