सीबीआय दिल्लीचे अधिकारी असल्याचे भासवत कारवाईची भीती दाखवून महिलेला हॉटेलमधील रूम बुक करायला लावली. बॉडी व्हेरिफिकेशनच्या नावाखाली ठगाने महिलेला कपडे काढायला लावल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. सायबर ठग हे फसवणुकीसाठी वृद्ध, गृहिणी यांना टार्गेट करत असतात.
ठगाने पोलीस असल्याची बतावणी करून महिलेला कपडे काढायला लावल्याची संतापजनक घटना मुंबईत घडली आहे. या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पीडित महिला उत्तर मुंबईत राहते. त्या अंधेरी येथे एका पंपनीत काम करतात. त्या कार्यालयात काम करत असताना त्याना तीन नंबर वरून पह्न आला. पह्न करणाऱयाने दिल्ली सीबीआयचा अधिकारी असल्याचे भासवले. दिल्ली सीबीआयचा अधिकारी असल्याने महिला या घाबरल्या.
ठगाने महिलेला व्हिडीओ कॉल केला. एका प्रकरणात तुमचा सहभाग असल्याचे भासवले. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी लागणार आहे. त्यामुळे गोपनीयता बाळगावी लागेल. यासाठी ठगाने महिलेला एक हॉटेलमध्ये रूम बुक करायला लावला. भीतीपोटी महिलेने रूमदेखील बुक केला. हॉटेलवर गेल्यावर ठगाने तिला पुन्हा व्हिडीओ कॉल केला. व्हिडीओ कॉलवरून नरेश नावाच्या व्यक्तीची माहिती सांगितली. मनी लॉण्डरिंगच्या गुह्यात सहभाग आढळून आला आहे. ठगाने महिलेला बोलण्यात गुंतवून तिच्या बँक खात्याची माहिती काढली. त्यानंतर ठगाने तिच्या खात्यातून 1 लाख 78 हजार रुपये वळते केले.
एवढय़ावर न थांबता ठगाने तिला कारवाईची भीती दाखवून बॉडी व्हेरिफिकेशन करायचे असल्याचे सांगितले. काही वेळाने ठगाने तिला व्हिडीओ कॉल केला. बॉडी व्हेरिफिकेशनच्या नावाखाली ठगाने तिला कपडे काढायला लावले. ठगाने महिलेचा तो व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील व्हायरल केला. त्या व्हिडीओची माहिती समजताच महिलेला धक्का बसला. याआधी सप्टेंबर महिन्यात एका तरुणीलाही गुन्हे शाखेचे अधिकारी भासवून बॉडी व्हेरिफिकेशनच्या नावाखाली कपडे उतरवायला भाग पाडले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.