सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना विविध स्तरातून भरघोस पाठिंबा मिळत आहे. आज बंडखोर सेना महाराष्ट्र या पुरोगामी विचाराच्या पक्षाने पृथ्वीराज पाटील यांना जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले. सहकार तपस्वी माजी खासदार स्व. गुलाबराव पाटील यांच्या सहकार व काँग्रेस पक्षाच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन पृथ्वीराज पाटील हे सुध्दा शाहू - फुले - आंबेडकरी विचारानुसार कार्य करीत आहेत व संविधान संरक्षण आणि बहुजन समाज विकासासाठी परिश्रम करत आहेत. हे त्यांचे कार्य बंडखोर सेना महाराष्ट्र सांगली शहर या पक्षाला आवडले. त्यामुळे पक्षाच्या हनुमान हाॅटेल.. काँग्रेस भवनासमोर सांगली येथे झालेल्या कार्यकर्ता बैठकीत सांगली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना पाठिंबा देऊन त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी सहकार्य करण्याचे ठरले.
त्याप्रमाणे आज प्रा. लक्ष्मण मोरे राज्य प्रवक्ते, विजय चांदणे प्रदेशाध्यक्ष, निलेश मोहिते प्रदेश उपाध्यक्ष, विशालभाई सौंदडे, जिल्हा अध्यक्ष, दयानंद आवळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, अमोल हिंगसे सांगली शहराध्यक्ष, कुमार वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष व पृथ्वीराज पाटील यांचे यशोधन सेवा व संपर्क कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी प्रा. एन.डी.बिरनाळे उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.