महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे त्यामध्ये पृथ्वीराज पाटील हवेत
पृथ्वीराज पाटील यांच्या कार्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली ---आमदार
बाळासाहेब थोरात
सांगली दि.१३: यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, गुलाबराव पाटील, राजारामबापू पाटील, पतंगराव कदम, मदनभाऊ हे सांगलीचे ताकदीचे नेते होते. पृथ्वीराज पाटील यांचे शहर काँग्रेस अध्यक्ष म्हणून पाच वर्षे केलेले काम कौतुकास्पद आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने व प्रदेश काँग्रेस कमिटीने जे जे कार्यक्रम दिले ते ते उत्तमरीत्या पृथ्वीराज यांनी पार पाडले आहेत. महापूर आणि कोरोना काळात केलेली सेवा अविस्मरणीय आहे. पद नसताना त्यांनी १० कोटीचा निधी आणला. आमदार असते तर, १०० कोटी आणले असते. आमदार गाडगीळ हे जात धर्म या विषयात अडकले त्यांनी दुसरे काही केले नाही.
महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे त्यामध्ये पृथ्वीराज पाटील हवेत. मोदींनी ७० हजार का घोटाळा असा आरोप ज्याच्यावर केला त्याच्या हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या. राज्यात भ्रष्टाचार, अमली पदार्थ व टक्केवारी याचा हैदोस सुरु आहे. लोकसभेच्या पराभवाच्या भितीने लाडकी बहीण योजना महायुती सरकारने सुरु केली आहे. हा इलेक्शन जुमला आहे. आम्ही सत्तेवर आल्यास लाडक्या बहिणीला महालक्ष्मी योजनेतून दरमहा रु.३००० देणार आहे. पंचसूत्री नुसार शेतकरी कर्ज माफी,जातीनिहाय जनगणना, २५ लाखाचा आरोग्य विमा, जुनी पेन्शन योजना, बेरोजगार भत्ता र.४०००देणार आहोत. पृथ्वीराजबाबा पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्या. तुमची सगळी कामे पूर्ण केली जातील असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. आज सांगलीवाडी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
यावेळी पृथ्वीराज बाबा म्हणाले, 'माझे काम पाहून पक्षाने उमेदवारी दिली आहे. सांगलीवाडीकर दबावाला बळी न पडता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. बंडगोरीने माझ्यावर अन्याय झाला आहे. जयश्रीवहिनींनी माघार घ्यावी म्हणून सर्व नेत्यांनी प्रयत्न केले. मीही विनंती केली. तरीही माघार घेतली नाही. दहा वर्षे काम करुनही यांचा विरोध कशासाठी? शेवटी शहर जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, आता निवडून आला तर पुढची निवडणूक मी अथवा माझ्या मुलाने लढवायची नाही असे बाँडपेपरवर लिहून देण्याची अट घातली.
तीही तयारी केली. शेवटच्या घटकेपर्यंत वाट पाहिली तरीही अपक्ष उमेदवारी ठेवलीच. त्यांना भाजपाचा, काँग्रेसचा की माझा पराभव करायचा आहे? अपक्ष उमेदवारी नको होती. सांगलीवाडीकर जे ठरवतात ते सांगलीत घडते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात थोरात साहेबांनी सांगलीसाठी जे मागितले ते दिले आहे. आमदार गाडगीळ यांना सात वर्षांत ३५००० मालमत्तावरील ई सत्ता प्रकार निर्बंध हटवता आले नाही ते त्यांनी तीन महिन्यांत हटवले तसा शासन निर्णय पारित केला. नगरविकास खात्याकडून १०कोटीचा निधी मंजूर केला. आता माझ्या हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी मला निवडून द्या. सांगली अधिक चांगली केल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी पृथ्वीराज पाटील यांच्या वैयक्तिक जाहिरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. तसेच सुनंदा राजाराम चव्हाण यांचा काँग्रेस पक्ष प्रवेश झाला. यावेळी हरीदास पाटील, दिलीप पाटील, महाबळेश्वर चौगुले, वंदना कदम, अपर्णाताई कदम, मदनभाऊ पाटील, सच्चिदानंद कदम,बाळासाहेब गुरव, अभिजित कोळी, विष्णूआप्पा पाटील, वसंतभाऊ पाटील, पांडुरंग भिसे, सचिन चव्हाण, आकाराम कदम, अमृता चोपडे, सुरेखा सातपुते, आनंदा पाटील, उमेश पाटील, कृष्णा पाटील, अनिल लोकरे, वसंतआप्पा पाटील, सुखदेव मोहिते, विद्याताई पाटील, लक्ष्मण भोसले आप्पा प्रकाश सुर्यवंशी दाजी, छायाताई पाटील, कमल गोरे, मोहन पाटील, सनी चव्हाण अशोक पाटील, तुकाराम भिसे, बंटी कांबळे, अतुल आवळे, किरण आडमुठे व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.