सोशल मीडियावर सध्या काँग्रेस नेत्याचा एक अश्लील व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. यामध्ये काँग्रेस नेता एका मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहे. उत्तर प्रदेशातील बागपतचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि छपरौली विधानसभेचे माजी उमेदवार युनूस चौधरी यांचा हा कथित व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या चौधरी यांनी हे राजकीय विरोधकांचे षड्यंत्र असल्याचे म्हटले. तो एडिट करुन व्हायरल करण्यात आल्याचे देखील ते म्हणाले.
दरम्यान, शुक्रवारी (1 नोव्हेंबर) सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. या अश्लील व्हिडिओमध्ये काँग्रेस नेते युनूस चौधरी दिसत आहेत. व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत एक मुलगी असून दोघांमध्ये अश्लील संभाषणही सुरु आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चौधरी यांनी हा व्हिडिओ आपला नसल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यात त्यांचे अनेक राजकीय विरोधक आहेत, ज्यांना त्यांची बदनामी करायची आहे. त्यामुळेच हा अश्लील व्हिडीओ एडिट करुन व्हायरल करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.
दुसरीकडे, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास आपण पोलिसांना कळवले असल्याचे देखील ते म्हणाले. मात्र, चौधरी यांनी अद्याप पोलिसांकडे लेखी तक्रार दिलेली नाही. या प्रकरणी इतर अनेक काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या माहितीत असा कोणताही व्हिडिओ उपलब्ध नाही. व्हिडिओसंबंधी चौकशी केली जाईल. त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.