Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

निकालानंतर शिंदे गट भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, हिंगोलीत गोळीबाराच्या घटनेने तरुणासह चौघे जखमी


निकालानंतर शिंदे गट भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, हिंगोलीत गोळीबाराच्या घटनेने तरुणासह चौघे जखमी


महाराष्ट्राच्या २८८ जागांसाठी २३ नोव्हेंबरला मतमोजणी पार पडली. निकालाच्या शेवटच्या फेऱ्या समोर येत असताना कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता.

पण हिंगोलीत निकालानंतर शिंदे गट आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यानं मोठा राडा झाल्याचे सांगण्यात आले. या हाणामारीत तीन ते चारजण जखमी झाले असून गोळीबार करण्यात आल्यानं एक तरुण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटन शनिवारी (२३ नोव्हेंबर) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमी तरुणासह चौघांन उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले शिंदेसेना व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे बोलले जात आहे. मराठवाड्यात अटीतटीच्या निकालानंतर हिंगोलीत निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची चर्चा होती. या हाणामारीचे आणि गोळीबाराचे नेमके कारण काय हे अद्याप समोर आले नाही.

नक्की झाले काय?
हिंगोलीमध्ये काल विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुपारी दोन वाजताच्या सुमारास शिंदे शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. काही कार्यकर्त्यांनी मिळून भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्या घरावर हल्ला केला आहे. यात चव्हाण यांच्या घरा समोरील दोन चारचाकी गाड्या फोडण्यात आल्या आहेत. या राड्यात गोळीबारही झाल्याची माहिती समोर येत आहे. कळमनुरी विधानसभेत विजयी झालेले संतोष बांगर यांच्या पुतण्याला गोळी लागल्याची माहिती आहे त्यांना हैद्राबाद येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे तर इतर ३-४ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर तलवारीच्या वारामुळे पप्पू चव्हाण यांच्या भावाला गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांच्यावर सुद्धा रुग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी पप्पू चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये 60 ते 70 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते

महाराष्ट्राच्या २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान झालं. मराठवाड्यात लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महायुतीसमोर विधानसभेत अव्वल येण्याचं एकच आव्हान होतं. महायुतीसमोर विधानसभेत अव्वल येण्याचं एकच आव्हान होतं. निकालानंतर राज्याचं सत्तेचं चित्र स्पष्ट झालं असून महायुतीनं मुलुख मैदानी बाजी मारल्याचं दिसून आलं. दरम्यान हिंगोलीत विधानसभेसाठी तानाजी मुटकुळे हे भाजपकडून उभे होते. तर उद्धव ठाकरे गटाकडून रुपालीताई पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. यात भाजपचे तान्हाजी मुटकुळे विजयी झाले.

हिंगोलीच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर दोन गटात राडा झाल्याची घटना घडली. यामध्ये झालेल्या हाणामारीत चौघेजण जखमी झाले तर गोळीबारही झाल्याने तरुण गंभीर जखमी झाला. कळमनुरी मतदारसंघातील विधानसभा मतमोजणीपूर्वी काही तरुणांनी कयाधू अमृतधार महादेव मंदिरात पूजा सुरू केली होती दुपारी निकाल जाहीर झाल्यानंतर जमावाने बळसोंड भागात जाऊन एका घरावर हल्ला केला. यात संजय चव्हाण हा युवक जखमी झाला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.