सांगली दि. १५: दहा वर्षापूर्वी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय घेऊ असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले ते आजतागायत दिले नाही. पाच वर्षापूर्वी एक हजार कोटी निधी देऊ असे सांगितले पण ते दिले नाही. भाजपात धनगर समाजाला किंमत नाही..ही निवडणूक सर्वांची आहे. भाजपा हा पक्ष जाती धर्मात भांडणं लावतो. माळी, धनगर वंजारी हा माधव पॅटर्न केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठी वापरतो. लाडकी बहिण अडीच वर्षापूर्वी नव्हती का? आताच ती लाडकी झाली. हा सगळा इलेक्शन जुमला आहे. पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या खांद्यावर घोंगडं आणि हातात काठी दिली याचा अर्थ धनगर समाज शब्दाला पक्का असतो. विश्वास ठेवतो. लव्हली सर्कल चौकात महाराणी अहिल्याबाई होळकर स्मारक करण्याचा शब्द आमदार गाडगीळ यांनी पाळला नाही. पृथ्वीराजबाबा आता तुम्ही ते पूर्ण करा.
धनगर आरक्षणासाठी विधीमंडळात आवाज उठवा. पृथ्वीराजबाबा यांना आमदार करा ते आपले प्रश्न सोडतील. आपली फसवणूक केलेल्या भाजपाला आणि अपक्षाला मतदान करु नका.. यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे थेट वंशज भूषणसिंहराजे सांगलीत माझ्या प्रचारात सहभागी झाले. त्यांचा पायगुण मला विजयी करणार हा विश्वास आहे. आश्वासन देऊन फसवणूक केलेल्या भाजपाला मत देऊ नका. त्यांना धडा शिकवा. दहा वर्षे मी काम करतोय आता पाच वर्षे मला द्या मी आपल्या आरक्षण प्रश्नावर विधीमंडळात आवाज उठवणार आणि लव्हली सर्कल चौकात अहिल्याबाई होळकर स्मारक करण्यासाठी कटिबद्ध आहे असे सांगून हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. नामदेव कस्तुरे, अजित दुधाळ, आण्णा महाराज व प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी पृथ्वीराजबाबांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले.
प्रारंभी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. स्वागत सागर व्हनमाने व आभार दादा शिंदे यांनी मानले. प्रशांत देशमुख, प्रकाश बन्ने, सुरेश बंडगर, अजित दुधाळ, डॉ. विक्रम कोळेकर, तानाजी व्हनमाने, अमोल गडदे, प्रा. एन.डी.बिरनाळे, संभाजी सरगर, ए. डी. पाटील, इलाई बारूदवाले, आप्पासाहेब पाटील व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.