Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नाहीच ?

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नाहीच ?
 

मुंबई: आज ओम बिर्ला यांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे हे सायंकाळी दिल्लीला रवाना झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेत मुख्यमंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय घेण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जात होते.


विधानसभेचा निर्णय लागल्यानंतर सर्वपक्षीय विजयी आमदारांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मंत्रिपदासाठी या आमदारांच्या हालचालीही सुरू झाल्या. आपल्या  शिंदे गटाने आमदारांना पंचतारांकित हॉटेलात एकत्र करून गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची अधिकृतपणे निवड केली. अजित पवार यांनीही आपल्या देवगिरी बंगल्यावर आमदारांना बोलावले. या बैठकीत अजित पवार यांची गटनेतेपदी अधिकृतपणे निवड झाली. 

केवळ भाजपाने अद्याप गटनेत्याची निवड केलेली नाही. शिंदे गटाच्या आमदारांना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवून यश मिळाले आहे. शिवाय बिहारमध्ये ज्या प्रमाणे नितीशकुमार यांना भाजपाने मुख्यमंत्रीपद दिले त्याप्रमाणेच महाराष्ट्रातही घडावे, असे एकनाथ शिंदेंचे आमदार उघडपणे बोलत आहेत. 

याला प्रत्युत्तर देताना भाजपाचे रावसाहेब दानवे यांनी म्हटले की, प्रत्येक राज्याचे राजकारण वेगळे असते. बिहारमध्ये झाले ते येथे घडणार नाही. दानवे यांनी हे वक्तव्य केले असले तरी मुख्यमंत्री कोण याबाबत त्यांनीही मौन राखले आहे. दुसरीकडे अजित पवार गटाने मात्र जाहीरपणे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा दिला आहे. छगन भुजबळ यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आमचा विरोध नाही. जिल्हाध्यक्ष सुनिल तटकरे म्हणाले की, आमचा नेता अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावे, असे आम्हालाही वाटते. पण आमचा वास्तववादी पक्ष आहे. 

सध्याची आमदारांची संख्या पाहता आमचा मुख्यमंत्री होईल असे वाटत नाही. भाजपा नेता म्हणून ज्याची निवड करील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल. एकूणच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, भाजपाचा नवीन नेता उपमुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असे चित्र असू शकते. यात देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जातील, असे म्हटले जाते. त्यामुळे घवघवीत यश मिळाल्यानंतरही महाराष्ट्राची धुरा कोण वाहणार हे ठरविण्यासाठी काही काळ जाणार आहे.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.