सांगली, दि.९ : आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना यापूर्वीच्या दोन निवडणुकांच्या तुलनेत यावेळी उच्चांकी मताधिक्य देऊ, अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे युवा नेते गौतम पवार यांनी दिली. सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचारार्थ आयोजित विजय संकल्प सभेत ते बोलत
होते.गौतम पवार म्हणाले, माजी आमदार पैलवान संभाजी पवार यांना गाव भागाने
नेहमीच साथ दिली होती. सुधीरदादा गाडगीळ यांच्या पाठीशी ही गावभाग कायम
राहिलेला आहे. गेल्या दोन निवडणुकात येथून सुधीरदादाना मोठे मताधिक्य आपण
दिले होते; परंतु या खेपेस आपल्याला ते रेकॉर्ड मोडायचे आहे.
पवार म्हणाले,सुधीरदादांनी गावभागासह संपूर्ण सांगली शहरासाठी अनेक विकास कामे केली आहेत.विशेषत: युवक वर्ग त्यांच्याबरोबर नेहमीच राहिलेला आहे. त्यांनीही युवकांच्या प्रश्नांची नेहमीच जाण ठेवली आहे. सांगलीच्या क्रीडा क्षेत्राचा विकास हा त्यांचा अजेंडा आहे. त्यामुळे त्यांना मताधिक्य देण्यात युवक अग्रभागी असतील.पवार म्हणाले, गावभागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचा. प्रत्येक घरातील शंभर टक्के मतदान कसे होईल याकडे कटाक्षाने लक्ष द्या. अजिबात गाफील राहू नका.आमदार गाडगीळ म्हणाले, गावभागाने नेहमीच मला भक्कम पाठबळ दिले आहे. गावभागातील सर्व समस्या आपल्याला सोडवायचे आहेत. गावभागाला महापुराची असलेली भीती दूर करायची आहे.
भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष शांतिनाथ कर्वे म्हणाले, या निवडणुकीत गावभागातून सुधीरदादांना जास्तीत जास्त मतदान झाले पाहिजे. प्रत्येक घरात दादांचा संदेश पोहोचवा. दादांना मत म्हणजे सांगलीच्या विकासाला मत असा निश्चय करूनच पुढील आठ दिवस प्रचार करा. भाजप नेते विजय साळुंखे, भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हा सरचिटणीस प्रथमेश वैद्य यांचीही भाषणे झाली. यावेळी रामकृष्ण चितळे, सुबराव तात्या मद्रासी, स्मिता भाटकर, पूजा जोशी, रेखा पाटील, भक्ती बावडेकर,अनिकेत खिलारे, रुद्र बावडेकर, शुभम चव्हाण, अशोक शेट्टी,कृष्णा कडणे, अभिजीत मिराजदार यांच्यासह नागरिक युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
सांगली : गावभागात आयोजित प्रचार बैठकीत बोलताना प्रचार बैठकीत बोलताना आमदार सुधीरदादा गाडगीळ.
२) सांगली: आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या गावभागातील प्रचार बैठकीच्या वेळी उपस्थित भाजपचे पदाधिकारी ,कार्यकर्ते आणि नागरिक.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.