Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोण आहे स्मृती मंधानाचा प्रियकर? वयात आहे 'इतका' फरक; जाणून घ्या नेट वर्थमध्ये कोण आहे पुढे

कोण आहे स्मृती मंधानाचा प्रियकर? वयात आहे 'इतका' फरक; जाणून घ्या नेट वर्थमध्ये कोण आहे पुढे
 
 
टीम इंडियाची महिला क्रिकेटर स्मृती मानधना चर्चेत आली आहे. महिला वनडेत सर्वाधिक शतके झळकावणारी ती भारताची पहिली फलंदाज ठरली आहे. तिच्या या यशामुळे सोशल मीडियावर तिच्यावर चाहत्यांकडून आणि तिच्या प्रियजनांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यामध्ये तिचा प्रियकर पलाश मुच्छाल याच्या नावाचाही समावेश आहे. यामुळेच तिच्या चाहत्यांना स्मृती मानधना प्रियकर पलाश मुच्छाल नक्की कोण आहे याबद्दल माहिती जाणून घ्यायचे आहे. पलाश काय काम करतो? पलाशची एकूण संपत्ती किती आहे? पलाश आणि स्मृती मानधना यांच्या वयात काय फरक आहे? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. चला या प्रश्नाची उत्तर जाणून घेऊयात.

दोघांच्या वयात किती आहे फरक?

27 वर्षीय महिला क्रिकेटर स्मृती मंधानाला 29 वर्षीय पलाश मुच्छाल डेट करत आहे. दोघांच्या वयात दोन वर्षांचा फरक आहे.

पलाश काय काम करतो?

पलाश एक भारतीय संगीतकार आणि चित्रपट निर्माता आहे. त्याने अनेक बॉलीवूड गाणी संगीतबद्ध केली आहेत. संगीत देण्यासोबतच पलाश मुच्छाल हा चित्रपट दिग्दर्शकही आहेत. 2024 मध्ये, त्याचा 'काम चलू है' हा चित्रपट OTT वर प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये राजपाल यादव आणि जिया मानेक महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. ZEE5 वरही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याची मोठी बहीण पलक मुच्छाल ही एक बॉलीवूड गायिका आहे, जिने सलमान खानपासून हृतिक रोशनपर्यंतच्या चित्रपटांमधील गाण्यांना आवाज दिला आहे.

पलाशची एकूण संपत्ती किती आहे?

पलाशच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास, पलाश मुच्छालची एकूण मालमत्ता 20 ते 41 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे.

स्मृतीचे ODI मधील 8 वे शतक

स्मृतीच्या मानधनाबद्दल सांगायचे तर, मंगळवारी अहमदाबाद येथे झालेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय महिला संघाने न्यूझीलंड महिला संघाचा 6 गडी राखून पराभव केला. ही मालिका टीम इंडियाने 2-1 अशी जिंकली. स्मृती मंधानाने या सामन्यात भारतासाठी शतक झळकावले आणि यासाठी तिची सामनावीर म्हणून निवड झाली. स्मृतीचे ODI मधील 8 वे शतक होते आणि यामुळे तिच्या नावावर मोठा विक्रम झाला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.