महायुती सरकारने वंचित सव्वा कोटी धनगरांची फसवणूक केली.. गाडगीळ मौनी आमदार.. कष्टकऱ्यांसाठी कांहीच केले नाही. :,पृथ्वीराज पाटील
सांगली दि.७: महायुती शासनाने २०१९ मध्ये सत्तेवर येताच पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाचा आरक्षणाचा निर्णय घेऊ असे खोटे आश्वासन दिले.केवळ मतांसाठी गेल्या पाच वर्षांत धनगर समाजाला झुलवत ठेवून घोर फसवणूक केली आहे. सांगलीच्या आमदारांनी विधानसभेत एकही प्रश्न उपस्थित केला नाही. ते निष्क्रीय मौनी आमदार आहेत. भाजपाचे महायुती शासन अपयशी ठरले आहे. विस्तारीत भागातील हमालांच्या वस्तीत रस्ते, गटारी नाहीत, पिण्यासाठी शुध्द व मुबलक पाणी पुरवठा नाही, महिलावर सतत लैंगिक अत्याचार होत आहेत. आमदारांचा शहरातील नागरिकांशी जनसंपर्क नाही.सांगलीच्या अधोगतीला जबाबदार असलेल्या अशा निष्क्रीय आमदारांला बदलण्याची हीच वेळ आहे.आमदारांनी विधानसभेत प्रश्न मांडायचे असतात. जनहिताच्या निर्णयासाठी भांडावे लागते..
जनतेच्या कल्याणाचे कायदा पारित करुन घ्यायचे असतात. गेल्या वेळी माझी थोडक्या मतांनी हुकलेली संधी एकदा द्या. सांगली अधिक चांगली केल्याशिवाय राहणार नाही. २०नोव्हेंबरला माझ्या नावासमोरील हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी मला निवडून द्या असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी केले. ते रेल्वे स्थानक मालधक्क्यावर भारवाहकांच्या (हमाल) भेटी दरम्यान संवाद साधताना बोलत होते. यावेळी हमालांनी गोडाऊनना दरवाजे नाहीत,पुरेशा, पिण्याच्या शुध्द पाण्याची टंचाई आहे, ट्रॅकची उंची वाढवली पाहिजे, वीजपुरवठा सुरळीत नाही इ. प्रश्न उपस्थित केले. निवडून आल्यानंतर हमालांचे प्रश्न निकालात काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे पृथ्वीराज पाटील म्हणाले.
यावेळी म्हादबा मुकादम, बाजीराव शेजुळ, शंकर यमगर, ए. डी. पाटील, प्रशांत देशमुख, विजय चव्हाण वकील, नितीन तावदारे , प्रा. एन.डी.बिरनाळे, रघुनाथ नार्वेकर, गौस नदाफ, अभिजित सुर्यवंशी, विकास पाटील, श्रीकांत साठे, साजिद शेख, सौरभ रोकडे, आशिष चौधरी व हमाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.