विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया पार पडत असताना अनेक ठिकाणी गैर प्रकार झाल्याचा पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पैशाची वाटप होत आहे.
तर काही ठिकाणी ईव्हीएमची तोडफोड झाल्याचा पाहायला मिळत आहे. कराडमधील कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील एका मतदान केंद्रात मतदान अधिकारीच मतदारांना कमळाचे बटण दाबा म्हणून सांगत असल्याचा प्रकार समोर आलाय. मतदान अधिकारी अशा प्रकारे मतदारांना सांगत असल्याचं लक्षात येताच शरद पवार गटातील कार्यकर्त्यांना त्याला चोप दिलाय. तसेच मतदान अधिकारी बदलण्याची मागणी केलीय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.