सांगली, दि.१७ : निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. सुधीरदादा गाडगीळ यांच्यासारखा कार्यतत्पर, प्रामाणिक आणि कार्यकुशल लोकप्रतिनिधी विधिमंडळात असणे आवश्यक आहे. यासाठीच हा पाठिंबा देत असल्याचे यावेळी सर्व या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे सर्व अधिकारी सातारा सैनिक स्कूलचे विद्यार्थी आहेत. स्वतः सुधीरदादा गाडगीळ हे सुद्धा सातारा सैनिक स्कूलचे विद्यार्थी आहेत. यावेळी (सर्व अधिकारी निवृत्त)शौर्यचक्र विजेते विंग कमांडर प्रकाश नवले, ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर, ब्रिगेडियर सूर्यकांत जाधव, कर्नल नरेंद्र शहा, कर्नल सुरेश गाडगीळ, कर्नल भूषण कल्याणी, कर्नल चंद्रकांत पोळ,ग्रुप कॅप्टन खिलारे, अरुण देवल उपस्थित होते. त्यांनी सुधीरदादा गाडगीळ यांना निवडणुकीत विजयी व्हा अशा शुभेच्छा दिल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.