अहिल्यानगर, प्रकाशनगर परिसर सुधीरदादांच्या पाठीशी राहील प्रचार प्रारंभी नागरिकांची ग्वाही; भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचा पाठिंबा
सांगली : प्रभाग क्रमांक एक मधील अहिल्यानगर, प्रकाश नगर तसेच कारखाना परिसराचा विकास करण्यासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सातत्याने काम केले आहे. त्यामुळे हा सर्व परिसर निवडणुकीत त्यांच्याच पाठीशी राहील, अशी ग्वाही परिसरातील नागरिकांनी दिली.
सांगली विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचाराचा प्रारंभ अहिल्यानगर येथे झाला. त्यावेळी नागरिक , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भीमशक्ती रिपब्लिकन सेनेने सुधीरदादांना पाठिंबा दिला आणि निवडणुकीत त्यांचा घरोघरी प्रचार करू असे जाहीर केले.
सुधीरदादा गाडगीळ यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत आणि विजयाच्या घोषणा देत जल्लोषात स्वागत करण्यात आले. भाजप नेते पैलवान दिलीपराव सूर्यवंशी यांनी दादांनी प्रभाग क्रमांक एकसाठी केलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. या कामामुळेच आपण पुन्हा एकदा त्यांना सांगलीतून निवडून द्यायचे आहे असेही ते म्हणाले.
आमदार गाडगीळ म्हणाले, या परिसरात मला सातत्याने पाठिंबा मिळालेला आहे. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी मी विशेष लक्ष देऊन पाठपुरावा केला आहे. यापुढेही हा संपूर्ण परिसर सांगली शहरामध्ये एक विकसित भाग म्हणून पुढे आणण्यासाठी माझा प्रयत्न राहील.
सुधीरदादा यांच्या हस्ते घरोघरी प्रचार पत्रिकेचे वाटप करण्यात आले. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे नागरिकांनी घरोघरी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. त्यांनी केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आणि यापुढेही त्यांनीच आमदार म्हणून काम केले पाहिजे अशाही भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दादांच्या बरोबर जाऊन कार्यकर्त्यांनीही नागरिकांची भेट घेतली. याप्रसंगी कोमल चव्हाण, शोभाताई बिक्कड, गंगुताई नाईक, अरुणा वाघ, पल्लवी सुतार, राणी पाटील, मनीषा माळी, प्रीती विपट, सुनिता रुपनर , रवींद्र सदामते, मुकुंद चव्हाण, मोहन जाधव, कासम मकानदार, रणजीत मोरे, लक्ष्मण तोडकर, नाना पवार, मनोज पाटील, सुहास कल्ले, नवनाथ खिलारे, सिद्धू कांडगावे, विलास काटकर, राजेंद्र कदम, मेजर बजबळे, निवास लाटे, सुभाष गडदे, ऋषिकेश सूर्यवंशी उपस्थित होते.या कार्यक्रमामध्ये भिमशक्ती रिपब्लिकन सेना (महाराष्ट्र) यांनी सुधीरदादा गाडगीळ यांना जाहीर पाठिंबाचे पत्र दिले. बाळासाहेब कांबळे, शाहिद जावेद मुजावर, सौ. विद्या उत्तम मोरे तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शाहिद मुजावर यांनी सांगितले की, आमदार म्हणून दादांचे कार्य खरोखर खूप चांगले आहे. जनमानसात ठसा उमटवणारे तुमचे नेतृत्व आहे. त्यामुळे आमच्या भिमशक्ती रिपब्लिकन सेना (महाराष्ट्र) यांच्यातर्फे तुम्हाला जाहीर पाठिंबा देत आहोत आणि भरघोस मताने निवडून आणणार आहोत.
सांगली: प्रभाग क्रमांक एक मधील अहिल्यानगर, प्रकाशनगर येथे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी त्यांनी नागरिकांच्या भेटी घेतल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.