सांगली. ता.१४ : विजयनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयाला भेट देऊन वकिलांशी सुसंवाद साधला. सांगली मतदारसंघाच्या विकासासाठी वकिलांनी मला साथ द्यावी असे आवाहन अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी केले. यावेळी त्यांच्या समवेत बार असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली वकील संघटनेची जिल्हा न्यायालयात जयश्रीमदन पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठक पार पडली. यावेळी बार असोसिएशनच्या विविध मागण्या व प्रश्नांची चर्चा करण्यात आली.
यावेळी बार असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जयश्री मदन पाटील म्हणाले, वकील हा घटक समाजातील महत्त्वाचा घटक आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रमाणिक पणे काम करता. समाजात नीती मूल्य जपत असतात.न्यायालयीन कामकाजामध्ये न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचारी हे खरे संविधानाचा सन्मान करणारे असतात.
तसेच स्वर्गीय मदन पाटील यांनी नेहमीच न्यायाची बाजू जोपासली. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. वकिलानी मोठ्या संख्येने मतदान करून मला विजयी करण्याचे आवाहन अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी केले. यावेळी सांगली कोर्टातील वकील, बार असोसिएशनची पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.