Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धनत्रयोदशीला पती-पत्नीनं केली हजारो रुपयांची खरेदी, पण नंतर अचानक घडलं कांड

धनत्रयोदशीला पती-पत्नीनं केली हजारो रुपयांची खरेदी, पण नंतर अचानक घडलं कांड
 

दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. काल धनत्रयोदशी होती. या दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. या दिवशी खरेदी केल्याने त्या दिवशी लक्ष्मी घरी येते, असेही म्हटले जाते. मात्र, यातच आता एका कुटुंबासोबत धनत्रयोदशीच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली.

काय आहे घटना -

पती पत्नीने काल धनत्रयोदशीचे दिवशी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. यामध्ये त्यांनी जवळपास 13 हजार रुपयांचा किराणा खरेदी केला. मात्र, त्यांचा सर्व सामान ऑटोचालक घेऊन फरार झाला. धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी मुझफ्फरपुर पोलीस ठाण्याच्या गोला रोड परिसरात ही घटना घडली. यानंतर या दाम्पत्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

याबाबत महिला निर्मला देवी यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, त्या मूळ उत्तरप्रदेशातील मिर्झापूर येथील रहिवासी आहेत. गेल्या 9 महिन्यांपासून त्या आपल्या पतीसोबत मुझफ्फरपूरच्या गोबर्शाही चौक याठिकाणी भाड्याच्या घरात राहतात. या महिलेचा पती हा भगवानपुरा चौकमध्ये पाणीपुरी विकतो.

दिवाळी आणि छठपुजेचा सामान खरेदीसाठी महिला आपल्या पतीसोबत गेली होती. महिलेने जवळपास 13 हजार रुपयांचा सामान खरेदी केला. यानंतर त्यांना घरी यायचे होते. त्यांनी ऑटोही बुक केली. मात्र, ऑटोवाल्याने त्यांची फसवणूक केली. महिलेजवळ मोबाईलही नव्हता.

त्यांनी एका ऑटोमध्ये सर्व सामान ठेवला. तसेच एका दुकानावर मिरची पावडर खरेदी करण्यासाठी त्या गेल्या. यावेळी ऑटोवाल्याने महिलेच्या पतीला सांगत, जा, त्यांना बोलवून आणा असे सांगितले. ऑटोचालकाच्या सांगण्यावरुन पत्नीला बोलवण्यात महिलेचा पती गेला असता ते परत आले तोपर्यंत ऑटोचालक तेथून फरार झाला होता.

यानंतर दोन्ही जणांना खूप टेन्शन आले. त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगत याप्रकरणी तक्रार दिली. त्यांच्या या तक्रारीनंतर पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून याप्रकरणी ऑटोचालकाचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी राजकुमार यांनी दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.