Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत भव्य सर्व सोयीन युक्त सुसज्ज असेफळमार्केट उभारणारसुधीरदादा गाडगीळ; विष्णूअण्णा फळ मार्केटला भेट

सांगलीत भव्य सर्व सोयीन युक्त सुसज्ज असे फळमार्केट उभारणार सुधीरदादा गाडगीळ; विष्णूअण्णा फळ मार्केटला भेट
 
 
सांगली, दि. ९ :  येथील विष्णूअण्णा फळ मार्केटलगतच सुसज्ज सर्व सोयीनुक्त फळ मार्केट लवकरच उभे करण्यात येईल , असे आश्वासन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिले.


आमदार गाडगीळ यांनी विष्णूअण्णा फळ मार्केट मार्केटला आज भेट दिली. त्यावेळी  व्यापारी व शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.  आमदार गाडगीळ म्हणाले, सध्याच्या फळ मार्केट जवळचीच दोन एकर जागा मिळवून तेथे हे सुसज्ज फळ मार्केट उभे करण्यात येईल.  या उपक्रमाची पूर्ती लवकरात लवकर करण्यात येईल.

माजी आमदार दिनकरतात्या पाटील म्हणाले, यापुढे या मार्केटचा अधिक विकास झालेला दिसेल. त्यासाठी सुधीर दादांनी एक विशेष आराखडा तयार केला आहे. त्यामुळे येणारे दिवस हे फळ मार्केटसाठी सोन्याचे दिवस असतील.  
 
भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार म्हणाले, आमदार गाडगीळ यांनी आता या फळ मार्केटचा विकास करायचा निर्धार केला आहे. त्यामुळे यापुढे येथील सर्व समस्या दूर केल्या जातील. शेतकरी, व्यापारी,  हमाल, तोलायदार या सर्वांना न्याय दिला जाईल.
ओबीसी संघटनेचे नेते सुनील वाघमोडे म्हणाले, मार्केटमधील दुकानगाळे मालकी तत्त्वावर कायम करावेत अशी आमची मागणी आहे. मालकी कायम करावी अशी आमची मागणी आहे.   शैलेश पवार यांनी स्वागत केले.  माजी नगरसेविका सविता मदने, विलास शिंदे, कांदा बटाटा असोसिएशनचे सिद्धू तोडकर, व्यापारी अनिल आलदर, संजय यमगर, भारत खांडेकर, अतुल माने, वैभव शिंदे, पांडुरंग आलदर, गजानन आलदर, विजय साळुंखे, चेतन माडगूळकर, विश्वजीत पाटील तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

फोटो कॅप्शन 
 
1 ) सांगली: आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटला भेट दिली. त्यावेळी त्यांचे  जल्लोषात स्वागत करण्यात आले.
 
2 ) सांगली: विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यापारी आणि शेतकऱ्यांबरोबर संवाद साधला. 
 
3 ) सांगली :आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटमध्ये भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासमवेत व्यापारी आणि शेतकरी.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.