सांगली, दि.४: येथील कोल्हापूर रस्त्यावरील श्री स्वामीनारायण मंदिरात आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी भेट दिली आणि दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. मंदिर व्यवस्थापनातर्फे त्यांचा सत्कारही करण्यात आला. श्री स्वामीनारायण यांचे आशीर्वाद सुधीरदादांच्या पाठीशी आहेत असे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे जतीन मेहता यांनी सांगितले.
श्री स्वामीनारायण मंदिरात प्रत्येक रविवारी कीर्तन, प्रवचन भजन असे कार्यक्रम आयोजित केले जातात. आज सकाळी या कार्यक्रमासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना खास निमंत्रित करण्यात आले होते.त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर त्यांना त्यांना प्रसाद म्हणून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल माने म्हणाले,सुधीरदादा यांच्यासारखा चारित्र्यसंपन्न, प्रामाणिक आणि कार्यतत्पर लोकप्रतिनिधी दुर्मिळ असतो. आपले भाग्य आहे की आपल्याला असे लोकप्रतिनिधी लाभलेले आहेत. दादांनी आमदार म्हणून या मतदारसंघांमध्ये चार हजार कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. अनेक रस्ते केले. सांडपाण्याची व्यवस्था केली. तसेच पूल बांधले. मतदारसंघातील किमान ४५ मंदिरांच्या नूतनीकरणासाठी दादांनी मदत केली आहे.
यावेळी मंदिर ट्रस्टचे परेशभाई शहा म्हणाले, दादांना आम्ही आज मुद्दाम या ठिकाणी निमंत्रित केले होते. या मंदिराची पायाभरणी त्यांच्या हस्तेच झाली होती. मंदिराच्या उभारणीसाठीही त्यांनी भरीव मदत केली आहे.अशा चांगल्या व्यक्तीच्या पाठीशी राहणे हे आवश्यक आहे म्हणूनच आम्ही त्यांना येथे आमंत्रित केले.
आरती आणि सत्कारानंतर सुधीरदादा म्हणाले, फार न बोलता आपण काम करीत राहावे हा माझा स्वभाव आहे. त्यानुसार मी मतदार संघात जास्तीत जास्त विकास कामे करायचा प्रयत्न केला आहे. यापुढेही श्री स्वामीनारायण यांच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सर्व जनतेच्या पाठिंब्याने आपण सांगलीच्या प्रगतीसाठी आणखी काम करू.
यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप नेते विश्वजीत पाटील, रवी बाबर, शैलेश पवार,सुहास कुलकर्णी, युवराज बावडेकर उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
सांगली : येथील कोल्हापूर रस्त्यावरील श्री स्वामीनारायण मंदिरात आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी भेट देऊन देवाचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांचा मंदिर समितीतर्फे सत्कार करण्यात आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.