Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पृथ्वीराज पाटील यांच्या वार्ड नं. ९ मध्ये हडको काॅलनीतील पदयात्रेत हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ..प्रचारात जोरदार मुसंडी

पृथ्वीराज पाटील यांच्या वार्ड नं. ९ मध्ये हडको काॅलनीतील पदयात्रेत हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ..प्रचारात जोरदार मुसंडी 


घाम गाळून पोट भरणाऱ्या कष्टकऱ्यांच्या हितासाठी विधानसभा गाजवणार...
--पृथ्वीराज पाटील

सांगली दि.१३:महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज यांची आज हडको काॅलनीत प्रचार पदयात्रा काढण्यात आली.यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी गणराया, हनुमान, दत्त, साईबाबा व ताईबाई मंदीरात मनोभावे दर्शन घेतले. या पदयात्रेत गळ्यात काँग्रेस पक्षाचा दुपट्टा व डोक्यावर मी पृथ्वीराज बाबांचा असा मजकूर लिहिलेल्या टोप्या परिधान करुन हाती काँग्रेस पक्षाचे हात चिन्ह असलेले झेंडे उंचावत हजारो नागरिक सहभागी झाले होते.गल्ली बोळात पृथ्वीराज यांचे औक्षण करून त्यांना महिला भगिनी विजयी भव असा आशीर्वाद देत होते. पृथ्वीराजबाबा प्रत्येक घरात विनयाने नमस्कार करुन हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन करत होते. प्रचार पत्रके वाटण्याची कार्यकर्त्यांची लगबग सुरु होती. 

पृथ्वीराज नागरिकांशी संवाद साधताना म्हणाले, लक्ष्मी देवळाजवळ ऐंशी फूटी रस्त्याच्या पश्चिमेला हडको काॅलनीची मोठी वसाहत आहे. या लोकवस्तीत मोलमजुरी करणाऱ्याची संख्या दखलपात्र आहे.या भागातील जनतेसाठी गेल्या दहा वर्षांत विद्यमान आमदारांनी भरीव असे काहीही केले नाही. आमदार झाल्यावर या भागातील रस्ते व गटारी, शुध्द व मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी लक्ष घालणार आहे. रोजगार निर्मितीसाठी विशेष प्रयत्न करणार आहे.'
सांगली शहराच्या विस्तारित भागात पृथ्वीराज पाटील यांच्या गृहभेटी, गृहबैठका व पदयात्रेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. उपनगरातील भव्य पदयात्रेतील जनसागर पहाता पृथ्वीराज पाटील यांची निवडून सामान्य लोकांनी हाती घेतल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे. 

महायुती सरकारला सामान्य नागरिकांच्या कामाशी कांहीच देणंघेणं राहिले नाही. जातीधर्मात भांडणं लावून येन केन प्रकारे सत्ता बळकावणे एवढच काम महायुती सरकारने केले आहे. आता सामान्य माणूस सांगलीचा निष्क्रिय आमदार बदलणार असा विश्वास आहे असेही पृथ्वीराज पाटील म्हणाले. 

यावेळी इलाही व मदिना बारुदवाले, अल्ताफ पेंढारी, इरफान केडिया, इर्षाद पखाली, अनिता पांगम, उमर शेख, वाहिदा सनदी, अक्षय अलकुंटे, राहूल यमगर ,  साद  सय्यद , अक्षय गायकवाड, अक्षय अलकुंटे व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.