विकासाची गंगा कायम तेवत ठेवणार :
अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील मॅकेनिकल व्यवसाय असोसिएशन, वाल्मिकी
आवास, शिवाजी हौसिंग सोसायटी मध्ये प्रचार बैठक
सांगली, दि.१३: गेल्या काही वर्षापुर्वी सांगली शहरासह संपूर्ण विधानसभा मतदारसंघात विकासाची एक गंगा कायम ठेवणारे काम माजी मंत्री कै. मदन पाटील यांच्या पश्चात अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी केली आहे. म्हणुनच सर्वांच्या आशिवार्दांनी शहराबरोबर ग्रामीण भागातील विकासाची गंगा कायम ठेवण्यासाठी एकदा जयश्री मदन पाटील यांनाच मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा, असे आवाहन सांगली येथील मॅकेनिकल व्यवसाय असोसिएशन च्या बैठकी प्रसंगी किशोर शहा यांनी केले .
सांगली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मॅकेनिकल व्यवसाय असोसिएशन, वाल्मिक आवास , सांगली साखर कारखानापरिसर, शिवाजी हौसिंग सोसायटीमधील नागरिकांशी संवाद साधुन येथील अडचणी जाणुन घेतल्या. मॅकेनिकल व्यवसाय असोसिएशन च्या वतीने जयश्री मदन पाटील यांचे जंगी स्वागत करुन जाहीर पाठींबा दिला. तसेच शिवाजी हौसिंग सोसायटी मधील नागरिकांनी एक महिला आमदार जर विधानसभेवर जात असेल तर आपण सर्वांनी मिळून शिवाजी हौसिंग सोसायटी मधुन प्रचंड मताधिक्य देऊ असा यावेळी निर्धार ही करण्यात आला.
जुना बुधगांव रोडलगत असलेल्या वाल्मिक आवास मधील नागरिकांशी संवाद साधुन येथील अडचणी जाणुन घेतल्या . वाल्मिक आवास मधील नागरिकांच्या कुटुंबीयांना जो आधार दिला तो मदनभाऊंनी दिला होता. भाऊंच्या पश्चात आम्ही, आमचे कुटुंब कधीही येथील नागरिकांना विसरणार नाही. असे प्रतिपादन जयश्री मदन पाटील यांनी केले .
यावेळी सोनिया पाटील , युवा नेते हर्षवर्धन पाटील , किशोर शहा , नगरसेविका शुभांगी साळुंखे, विनोद पाटील, रणजित पाटील, आनंदा लेंगरे, हेमंत उर्फ बंडू पाटील, महेश साळुंखे, प्रतिक पाटील, राहुल पाटील, अरुण पाटील , यांच्यासह , महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.