Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हिरा धगधगणार ; परिवर्तन घडणारसंजय नगर मधील भव्य पदयात्रेत महिलांनी आणि नागरिकांनी दिला जयश्री मदन पाटील यांना विश्वास

हिरा धगधगणार  ; परिवर्तन घडणार संजय नगर मधील भव्य पदयात्रेत महिलांनी  आणि नागरिकांनी दिला जयश्री मदन पाटील यांना विश्वास 

सांगली विधानसभा मतदार संघात महिला अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांचा हिरा धगधगणार आणि जयश्री पाटील याच आमदार होणार अशा घोषणा  प्रभाग  क्र 11 मध्ये जोरदार निवडणूक प्रचार रॅलीमध्ये  देण्यात आल्या . या पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते, त्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. रॅलीमध्ये फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, या प्रचार दौरा वेळी जयश्री मदन पाटील बोलताना म्हणाल्या,
 
मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने आणि विकासाचे नवे पर्व सुरु करण्यासाठीच मी ही निवडणूक लढवत आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाला विश्वासात घेऊन विकासाचा भागिदारी बनविणाचा प्रयत्न करणार आहे. आपल्या प्रभागातील महिला, युवा युवती, नागरिक  व सर्व सामान्य जनतेने उत्स्फूर्त पाठिंबा दिला. याबद्दल सर्वांची आभारी आहे . येत्या 20 तारखेला मला प्रचंड मतांनी विजयी करा . 
आजची पदयात्रा  संजयनगर परिसरातून काढण्यात आली , या प्रभागामधील  कै . मदनभाऊ पाटील,  खासदार विशालदादा पाटील , यांच्या प्रयत्नातून  विविध समस्या सोडविल्या आहेत . या आपल्या हक्काच्या प्रभागातून मोठे मताधिक्य मागील निवडणुकीत ही मिळाले होते आणि या निवडणुकीत ही मिळणार आहे  असा विश्वास  जयश्री मदन पाटील यांनी यावेळी दिला .

 या प्रचार दौर्यावेळी युवा नेते हर्षवर्धन पाटील,  मोनिका कदम,   माजी महापौर कांचन कांबळे,  नगरसेविका शुभांगी साळुंखे,  नगरसेवक मनोज सरगर,  संजय कांबळे,  विशालदादा युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष हेमंत उर्फ बंडू पाटील,  महेश साळुंखे,  गजानन साळुंखे,  बापूसाहेब डोंबाळे,  संभाजी पाटील,  जमीर पटाईत,  सुधीर कांबळे,  यांच्यासह महिला , जेष्ठ नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.