Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लोणारी समाजाचा सुधीरदादा गाडगीळ यांना पाठिंबा जाहीर

लोणारी समाजाचा सुधीरदादा गाडगीळ यांना पाठिंबा जाहीर
 

सांगली, दि.१७: सांगलीतील लोणारी समाज सेवा समितीतर्फे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. सुधीरदादा गाडगीळ हेच सांगलीतून पुन्हा आमदार झाले पाहिजेत. त्यासाठीच आम्ही हा पाठिंबा देत असून त्यांच्या प्रचारातही समाजाचे कार्यकर्ते आणि लोक सहभागी होतील असेही  समाज समितीतर्फे सांगण्यात आले.
 
आमदार गाडगीळ यांनी गेल्या दहा वर्षात सांगली विधानसभा मतदारसंघाची प्रामाणिकपणे आणि मनःपूर्वक सेवा केली आहे. त्यांच्यासारखा लोकसेवक पुन्हा एकदा विधानसभेत जाणे अत्यावश्यक आहे, यासाठीच हा पाठिंबा असल्याचे समाजातर्फे स्पष्ट करण्यात आले.

यावेळी विजय नरळे, संजय खोत, बाबासाहेब गोडसे, सिद्धनाथ बजबळे,  बाबासाहेब मुंजे, नवनाथ खिलारे, दत्तात्रय हिप्परकर, हनुमंत कुटे, रामचंद्र खिलारे, गोपाळ  चवरे, युवराज कराडे, हनुमंत बजबळे,रघुनाथ नवत्रे, रवी सांगोलकर,बळवंत गळवे, श्रीकांत चवरे, सागर चवरे, सौरभ चवरे, शंकर करांडे, दिगंबर हिप्परकर, अमोल हिप्परकर, कुमार गळवे,अनिल बाड, दरीलिंग डुकरे, हनुमंत खांडेकर, मधुकर पंढरे, अजय करांडे, शिवराज खिलारे,रोहित खिलारे, ओंकार क्षीरसागर आदी पदाधिकारी आणि समितीचे सदस्य उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.