प्रभाग नऊमधील नागरिकांचा सुधीरदादांना उत्स्फूर्त पाठिंबा अभिनंदन कॉलनीत निवडणूक प्रचाराचा धडाकेबाज शुभारंभ
सांगली, दि.४: आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सातत्याने विकासकामे केल्यामुळे प्रभाग क्रमांक ९ चा चेहरामोहरा बदलला आहे. त्यामुळे आम्ही आमदार गाडगीळ यांच्याच पाठीशी ठामपणे राहणार आहोत. आमच्या प्रभागातून त्यांनाच उत्स्फूर्त पाठिंबा मिळतो आहे, असे उद्गार या प्रभागातील महायुतीचे कार्यकर्ते तसेच नागरिकांनी काढले.
प्रभाग क्रमांक नऊमधील निवडणूक प्रचाराचा प्रारंभ भाऊबीजेच्या मुहूर्तावर शिंदेमळ्यातील अभिनंदन कॉलनीत झाला. श्री सिद्धिविनायक मंदिरात नारळ फोडून आमदार गाडगीळ आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्ते तसेच नागरिकांनी प्रचाराची सुरुवात केली.
यावेळी नागरिकांनी सांगितले, हा प्रभाग किंवा हा सर्व परिसर पूर्वी उपेक्षितच राहत असे. परंतु सुधीरदादा गाडगीळ आमदार झाल्यानंतर या भागाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे परिसरामधील नागरी सुविधांची छोटी मोठी कामे मार्गी लागली. त्यामुळे या भागात सुधीरदादांच्या कामाबद्दल समाधान आहे. नागरिक या निवडणुकीतही त्यांच्याच पाठीशी उभे राहणार आहेत.
सुधीरदादा गाडगीळ यांनी या भागात विकास कामे करण्यासाठी कार्यकर्ते तसेच नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. ते म्हणाले, आपल्याला अजून या प्रभागाचा आणखी विकास करायचा आहे. हा सर्व परिसर आदर्श बनवायचा आहे. त्यासाठी तुमची सर्वांची साथ महत्त्वाची ठरणार आहे.
सुधीरदादांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. तसेच तालवाद्यांच्या गजरात मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच महिला ,पुरुष सहभागी झाले होते. तरुणांची आणि महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
श्री सिद्धिविनायक मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आल्यानंतर भारतीय जनता पक्ष, महायुती आणि सुधीरदादांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. भारतीय जनता पक्ष, जनसुराज्य पक्ष तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षाचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांच्याहस्ते सुधीरदादांचा सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित महिलांनी 'एकच वादा सुधीरदादा' अशा जोरदार घोषणा दिल्या. यानंतर परिसरातून प्रचारफेरी निघाली. सुधीरदादा तसेच कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन नागरिकांना प्रचारपत्रके दिली. तसेच त्यांच्याबरोबर चर्चाही केली.
यावेळी अतुल माने, बंडू सरगर , दरीबा बंडगर, श्रीकांत वाघमोडे, आनंदसागर पुजारी, राजू पठाण, आयेशा शेख, ज्योती माने, उषा गायकवाड, गंगा तिडके, गणपती तिडके, प्रशांत देवकर, कुपवाड शहर जन सुराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत देवकर, जनसुराज्य पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत काळे, भाजप नेते आश्रफ वांकर,सागर पुजारी, प्रवीण कुलकर्णी, सुनिता काळे, मीरा चौगुले, जयंत जाधव, प्रशांत राठोड, भूपाल सरगर, आशुतोष कलगुटगी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
फोटो
सांगली: येथील प्रभाग क्रमांक ९ मधील निवडणूक प्रचाराचा प्रारंभ आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते शिंदे मळ्यातील अभिनंदन कॉलनीत श्री सिद्धिविनायक मंदिरात करण्यात आला. त्यावेळी सुधीरदादांच्या नेतृत्वाखाली प्रचारफेरीही काढण्यात आली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.