डॉ. मकरंद खोचीकर यांचा जागतिक सन्मान
सांगली, ता. ४: नवी दिल्ली येथे झालेल्या सोसायटी इंटरनॅशनल युरोलॉजी या संघटनेच्या जागतिक परिषदेत येथील प्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ युरोलॉजिस्ट डॉ. मकरंद खोचीकर यांना या वर्षीच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले. जगभरातील १८० देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संस्थेचे जगभरातील दहा हजारांवर मूत्रविकार तज्ज्ञ सदस्य आहेत. मूत्रपिंड विकार व उपचार क्षेत्रातील संशोधन आणि विज्ञान आणि वैद्यकीय शिक्षण यावर सखोल संशोधन करणारी ही संस्था आहे. गेल्या पन्नास वर्षांत भारतातील चौघांना या पुरस्काराने गौरवण्यात आले असून यातील डॉ. खोचीकर सर्वांत तरुण सर्जन संशोधक ठरले आहेत.
गेल्या तीन दशकांपासून डॉ. खोचीकर यांनी मिरजेतील सिद्धिविनायक कर्करोग इस्पितळ व आणि उषःकाल हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. मुंबई आणि नडीयाल येथील युरोलॉजीतील शिक्षणानंतर त्यांनी लंडन आणि केंब्रीज येथे त्यांनी विशेष शिक्षण घेतले. त्यानंतर भारतात त्यांनी मूत्ररोग उपचार तसेच मूत्रपिंडाच्या कर्करोग उपचारांत निरंतर काम करताना संशोधन कार्य केले. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांना आतापर्यंत विविध पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. भारतातील युरोलॉजी सोसायटीसह पश्चिम विभागीय सोसायटीने त्यांचा गौरव केला आहे. आता सोसायटी इंटरनॅशनल युरोलॉजीचा हा बहुमान या वैद्यक शाखेतील सर्वोच्च पुरस्कार आहे. यावर्षी ही जागतिक परिषद दिल्लीत झाली. या परिषदेतर्फे झालेला हा गौरव भारताची शान वाढवणारा आहे. परिषदेचे अध्यक्ष डॉ. जिन डौलारोझेट व मावळते अध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.