नालासोपारा पूर्वेला असलेल्या सनशाइन सर्कल या परिसरामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना रात्रीच्या 11 वाजताच्या सुमारास घडली असून या ठिकाणी त्वरितच अग्निशमन दलाने युद्ध पातळीवर आग विझवण्याचे काम सुरू केले.
यामध्ये कोणताही प्रकारची जीवित हानी झालेली नाहीये. परंतु यामध्ये महानगरपालिकेचे ६ बस जळून खाक झालेले आहेत. या ठिकाणी अनेक वर्षांपासून भंगार बस ठेवलेल्या आहेत. पडीक परिस्थितीमध्ये असलेल्या बसमध्ये अनेकदा तरुण अमली पदार्थांचा सेवन करतात. तर याबाबत नागरिकांनी तक्रार केलेली होती.परंतु प्रशासनाच्या सततच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी अपघात वाढू लागलेल्या आहेत. आग लागल्याची घटना घडताच नालासोपारा चे नवचर्चित आमदार राजन नाईक यांनी या ठिकाणी पोचून घटनेची माहिती घेतली तसेच अग्निशमन दलाला व पोलिसांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.