जयश्री पाटील यांच्या सांगलीवाडीतील पदयात्रा व कॉर्नर सभेला जोरदार प्रतिसाद ; महिला, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग
सांगली, ता.१० : विद्यमान आमदारांनी गेल्या दहा वर्षापासून सांगलीवाडीला विकासापासून वंचित ठेवले. कोरोना आणि महापुराच्या काळात आमदार सांगलीवाडीत फिरकले नाहीत. विकास कामांसाठी पुरेसा निधीही दिला नाही. सांगलीवाडीवर सातत्याने अन्याय करणाऱ्या आमदाराला घरी बसवण्याची वेळ आली आहे अशी टीका अपक्ष महिला उमेदवार जयश्री पाटील यांनी केली.
सांगलवाडी येथे भव्य पदयात्रा संपन्न झाली. फटाक्यांची आतिषबाजी, धनगरी ढोल वादन आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात पदयात्रा निघाली. जागोजागी महिलांनी जयश्री वहिनींचे औक्षण केले. यावेळी राम मंदिर चौकात कॉर्नर सभा संपन्न झाली .
यावेळी पूजा पाटील म्हणाल्या, स्वर्गीय मदनभाऊच्या निधनानंतर जयश्री पाटील थांबल्या नाहीत. कोणत्याही कामाची त्यांनी कधीही जाहिरात केली नाही.चाळीस वर्षानंतर महिला आमदार निवडणुकीसाठी उभी आहे. आमची लढाई सत्यासाठी आहे. दादा घराण्याने सांगलीवाडीला कधीही वाऱ्यावर सोडले नाही. त्यामुळे जयश्री पाटील यांच्या हिरा या चिन्हसमोरील बटन दाबून मोठया मताधिक्याने निवडून द्या.
मा. विजय पाटील म्हणाले, गाडगीळांनी सांगलीवाडी गावावर अन्याय केले त्यामुळे विद्यमान आमदारांवर गाव नाराज आहे. तीन वर्ष फेऱ्या मारूनही कोंढार भाग रस्त्यासाठी निधी दिला नाही. खासदार निवडून आल्यावर दहा दिवसात मंजुरी मिळाली. विकासासाठी नेहमीच गाडगीळ यांनी सहकार्य केले नाही. दहा वर्षात सांगलवाडी गावावर अन्याय झाला आहे. त्यामुळे आम्ही जयश्री पाटील यांना 18 गावातून भरघोस मतांनी निवडून देऊ.यावेळी पदयात्रेदरम्यान महिलांनी सांगितले कि चाळीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच महिलेला आमदार करण्याची संधी आम्हाला चालून आली आहे ती आम्ही दवडणार नाही. याप्रसंगी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. जयश्री पाटील यांनी राम मंदिर, दत्त मंदिर, मंगेशवर मंदिर, बाळूमामा मंदिर, विठ्ठल मंदिर, बौद्ध वसाहत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.याप्रसंगी आनंदराव पाटील, एकनाथ पाटील, जी .के. पवार, भगवान पाटील, पी.आर.पाटील, रामचंद्र पाटील, डी.वाय. पाटील, बाळासो कदम, शंकर पाटील, अमोल मोहिते यासह आदी मान्यवर उपस्थित होत. या ठिकाणी पदयात्रा संपन्न......! राम मंदिर पासून दत्त चौक, झाशी कॉलनी, राणा प्रताप चौक, गाडगीळ प्लॉट, मंगेश वर चौक, धनगर गल्ली, विठ्ठल मंदिर, चावडी परिसर, मोहिते गल्ली, हनुमान चौक, शेवट राम मंदिर येथे प्रचार सभा झाली .
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.