Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजमेर दर्ग्याचा इतिहास काय आहे? दर्गा-मंदिराचा नवा वाद काय, हिंदूसेनेने का ठोठावला कोर्टाचा दरवाजा?

अजमेर दर्ग्याचा इतिहास काय आहे? दर्गा-मंदिराचा नवा वाद काय, हिंदूसेनेने का ठोठावला कोर्टाचा दरवाजा?
 

राजस्थानमधील अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याच्या जागी शिवमंदिर असण्याचा दावा आणि या सर्व प्रकरणाची आता मोठी चर्चा होत आहे. हिंदू सेनेचे प्रमुख विष्णू गुप्ता यांनी अजमेर दर्ग्याला संकटमोचन महादेव मंदिर म्हणून घोषित करण्याची मागणी करणारी याचिका अजमेर न्यायालयात दाखल केली आहे. विशेषतः अजमेरच्या दिवाणी न्यायालयाने 27 नोव्हेंबर रोजी हिंदू सेना प्रमुख विष्णू गुप्ता यांची 38 पानांची याचिका स्वीकारली आहे. अजमेर दर्ग्याच्या जागेवर दावा केल्यामुळे आणि न्यायालयात याचिकाही दाखल झाल्यामुळे आता याविषयावर चर्चा होत आहे. आपण आज अजमेर दर्ग्याचा इतिहास काय आहे हे पाहूया.

 
अजमेरच्या दर्ग्याचा इतिहास

ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांची कबर अजमेर शहरात आहे. मोईनुद्दीन चिश्ती यांचा जन्म 537 हिजरी संवत म्हणजेच इ.स.पूर्व 1143 मध्ये पर्शियाच्या सिस्तान प्रदेशात झाला असे मानले जाते. इतर संदर्भानुसार, त्यांचा जन्म इराणच्या इस्फहान शहरात झाला असे सांगण्यात येते मात्र, यासंदर्भात ठोस माहिती तूर्त नाही. विकिपीडियानुसार, ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याचे खादिम भील हे भिल्ल पूर्वजांचे वंशज असल्याचे सांगितले जाते. त्यांना हजरत ख्वाजा गरीब नवाज म्हणूनही ओळखले जाते. गरीब नवाज ही त्यांना लोकांनी दिलेली पदवी आहे.

भारतात रुजला सुफी पंथ

मोईनुद्दीन चिश्ती साहिब यांनी भारताच्या उपखंडात सुफी पद्धतीची स्थापना आणि प्रचार केला. हा आध्यात्मिक मार्ग होता, भारत हा एक आध्यात्मिक देश असल्याने ही पद्धत येथे रुजली आणि स्वागतार्ह झाली, स्वीकारली गेली. धार्मिकदृष्ट्या ही पद्धत अतिशय शांततापूर्ण होती आणि धार्मिक चिन्हांनी परिपूर्ण असल्यामुळे भारतीय समाजात त्यांचे शिष्य अधिक झाले. त्यांची चर्चा दूरवर पसरली आणि लोक दूरदूरवरून त्याच्या दरबारात हजर राहून धार्मिक ज्ञान मिळवत होते.

अजमेरमध्ये जेव्हा ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती साहीब धर्मप्रचार करत असत तेव्हा ते चिश्ती पद्धतीने करत असत. यामध्ये श्लोक गायनाद्वारे देवाची गीतं लोकांपर्यंत पोहोचवली गेली. याचा अर्थ, कव्वाली, समखवानी आणि कादंबऱ्यांद्वारे लोकांना देवाबद्दल सांगणे आणि त्यांना मुक्तीचा मार्ग दाखवणे होय. स्थानिक हिंदू राजांशीही अनेक मतभेद होते, परंतु ते सर्व मतभेद अल्पकालीन होते. मोईनुद्दीन साहेबांच्या प्रवचनाने स्थानिक राजाही मंत्रमुग्ध झाले असे विकिपीडियातील माहितीनुसार, दिसते. दरवर्षी त्यांचा उर्स हजरतच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होतो.

अजमेर दर्गा आणि हिंदू मंदिर वाद

अजमेर दर्ग्याच्या जागी हिंद मंदिराचा वाद, या दाव्यामागे निवृत्त न्यायाधीश हरबिलास शारदा यांच्या कार्याचा संदर्भ असून, अजमेर दर्ग्याची नोंदणी रद्द करावी, अशी मागणीही हिंदू सेना प्रमुख विष्णू गुप्ता यांनी आपल्या याचिकेत केली आहे एएसआयचे सर्वेक्षण करून हिंदूंना येथे पूजा करण्याचा अधिकार द्यावा.

पुढील सुनावणी 20 डिसेंबरला होणार

अजमेर दर्ग्याला संकटमोचन महादेव मंदिर म्हणून घोषित करण्याची मागणीवरील याचिकेवर आता पुढील सुनावणी 20 डिसेंबरला होणार आहे. दिवाणी न्यायाधीश मनमोहन चंदेल यांच्या न्यायालयाने अजमेर दर्गा समिती, अल्पसंख्याक मंत्रालय आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) यांना नोटीस बजावून त्यांचे उत्तर मागितले आहे.
दावा करणारे हिंदु सेनेचे विष्णू गुप्ता कोण?

अजमेर दर्गा हे शिवमंदिर असल्याचा दावा करत याचिका दाखल करणारे विष्णू गुप्ता कोण आहेत असा सवाल सर्वांनाच पडत आहे. सांगायचे झाल्यास विष्णू गुप्ता यांचा जन्म एटाह, यूपी येथे झाला आहे. अजमेर दर्ग्याचे संकट मोचन महादेव मंदिर असल्याचा दावा ते करीत आहेत. 38 वर्षीय विष्णू गुप्ता यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत 2011 मध्ये हिंदू सेनेची स्थापना केली होती. विष्णू गुप्ता त्यांच्या शालेय-महाविद्यालयीन काळापासून हिंदू राष्ट्रवादी विचारसरणीचे पालन करत आहेत. महाविद्यालयीन काळात विष्णू गुप्ता यांनी शिवसेनेच्या युवा शाखेत प्रवेश केला होता. मात्र, सध्या विष्णू गुप्ता यांच्या हिंदू सेनेचा शिवसेना किंवा आरएसएसशी संबंध नाही.

विष्णू गुप्ता आणि हिंदू सेनेशी संबंधित वाद

विष्णू गुप्ता यांची हिंदू सेना आपल्या कट्टर हिंदू राष्ट्रवादी विचारसरणीमुळे अनेकदा वादात सापडली आहे. विष्णू गुप्ता यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्या प्रमुख वादांमध्ये जानेवारी 2016 मध्ये नवी दिल्लीतील पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या कार्यालयाची तोडफोड आणि जानेवारी 2014 मध्ये जमावासोबत हिंदू सेनेने गाझियाबादमधील आम आदमी पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना यांचा समावेश होतो.

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या तैनातीसाठी सार्वमत घेण्यात यावे, अशी मागणी करणारे आप नेते प्रशांत भूषण यांचे विधान हे आम आदमी पार्टीच्या कार्यालयात झालेल्या तोडफोडीचे कारण होते. याशिवाय जानेवारी 2024 मध्ये दिल्लीतील बाबर रोडवरील साइन बोर्डवर अयोध्या मार्गाचे स्टिकर्स चिकटवण्यात आले होते.

जून 2023 मध्ये, आदिपुरुष चित्रपटाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली होती. आदिपुरुषावर बंदी घालण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. अभिनेता आणि नेते कमल हसन यांनी नथुराम गोडसेला हिंदू दहशतवादी म्हटले होते,यावर मे 2019 मध्ये दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.