Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुधीरदादांच्या प्रचारासाठी अमित शहा आज सांगलीतभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर दुपारी जाहीर सभा

सुधीरदादांच्या प्रचारासाठी  अमित शहा आज सांगलीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर दुपारी जाहीर सभा
 
 
सांगली, दि.७: सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या निवडणूक प्रचारासाठी केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा शुक्रवारी( दिनांक ८ ऑक्टोबर ) येथे येत आहेत. येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर दुपारी दोन वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीतील घटक  पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते या सभेची जय्यत तयारी करीत आहेत. सभेसाठी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात येत आहे.

सांगली विधानसभा मतदारसंघातून आमदार गाडगीळ तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. दिनांक २४ऑक्टोबररोजी त्यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर  प्रचाराचा धडाका सुरू आहे. वेगवेगळे समाज घटक, मंडळे, क्रीडा संस्था  या ठिकाणी उपस्थित राहून सुधीर दादांनी मोठी लोकसंपर्क मोहीम राबवली आहे. बुधवारी सायंकाळी सांगलीत श्री गणेश मंदिरात त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. त्यानंतर मारुती चौकात झालेल्या प्रचंड जाहीर सभेत  सुधीरदादांच्या विजयाची हॅट्रिक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्ष महायुतीतर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेबद्दल सांगली विधानसभा मतदारसंघातच नव्हे संपूर्ण जिल्ह्यात उत्सुकता आहे. अमित शहा या निवडणूक प्रचार दौऱ्यात नेमके काय बोलणार याबद्दल लोक लोकांमध्ये उत्सुकता आहे. भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, जनसुराज्य शक्ती, रयत क्रांती संघटना असे सर्व घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते या सभेची जय्यत तयारी करीत आहेत. जास्तीत जास्त संख्येने लोक सभेसाठी यावेत असा प्रयत्न सुरू आहे. काल मारुती चौकात झालेल्या जाहीर सभेत स्वतः आमदार सुधीरदादांनी सुद्धा लोकांना अमित शहा यांच्या  उपस्थितीत होणाऱ्या जाहीर सभेसाठी येण्याचे आवाहन केले होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.