विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. उमेदवारांनी प्रचारासाठी मोठी तयारी केली आहे. दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी मतदारांना घरोघरी भेटी देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, काल रोहित पाटलांचे कार्यकर्ते फराळाच्या बॉक्समधून तीन हजार रुपये वाटत असताना रंगेहाथ पकडण्यात आल्याचा दावा माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केला आहे. दरम्यान, आता या आरोपाला रोहित पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
माजी खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तासगाव विधानसभा मतदारसंघात एक गावात रोहित पाटलांचे कार्यकर्ते दिवाळी फराळच्या बॉक्समध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांना प्रत्युत्तर देताना रोहित पाटील म्हणाले, 'काल तासगावला घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. माझं नाव घेण्यासाठी काय पराकोटीचे दडपण संबंधित व्यक्तीवर टाकले याची काही माहिती आम्हाला मिळते. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात अशापद्धतीचा प्रकार संजयकाका पहिल्यांदा करतात असंही नाही. ते कुठल्या पातळीला जातील हे लोकांना माहित आहे आणि माझ्या लोकांना माझ्यावर विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी दिली.
"पाच वर्षे काम करणाऱ्याला असल्या गोष्टी करायची गरज नसते. मी पाच वर्षे काम केले आहे हे लोकांना माहित आहे. त्यांनी केलेले नाही हे लोकांना माहित आहे, अशा पद्धतीने बदनामीचे राजकारण कोण करत आहे हे लोकांना माहित आहे लोक त्याला उत्तर देतील, असं प्रत्युत्तर रोहित पाटील यांनी माजी खासदार संजयकाका पाटील यांना दिले.
माजी खासदार संजयकाका पाटलांचे आरोप काय?
काल तासगावमध्ये दिवाळी फराळामध्ये तीन हजार रुपये वाटल्याची घटना समोर आली. हे कार्यकर्ते रोहित पाटील यांचे असल्याचा आरोप संजयकाका पाटील यांनी केला. संजयकाकांनी यावेळी रोहित पवार यांच्यावर टीका केली. संजयकाका पाटील म्हणाले,'निवडणुकीमध्ये सहानुभूतीच राजकारण करणाऱ्या रोहित पाटलांचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. जनता अशा लोकांना धडा शिकवेल. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्यास हजारो लोक पोलीस ठाण्यासमोर येऊन बसणार असल्याचा इशारा संजयकाका पाटलांनी दिला आहे'.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.