नवी दिल्ली : ऑक्टोबर, दिवाळीचा पहिला दिवस... ज्यादिवशी सगळीकडे दिवाळीचा उत्साह होता. याच दिवाळीच्या पहिल्या रात्री एका पत्नीने आपल्या पतीसोबत भयानक कांड केला आहे. पत्नीने पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि त्यानतंतर ती फरार झाली.
देशाची राजधानी दिल्लीतील ही धक्कादायक घटना आहे. उत्तर दिल्लीत राहणारी ही व्यक्ती. या व्यक्तीने 1 नोव्हेंबरला पोलिसात तक्रार दिली. आपल्या पत्नीने आपला प्रायव्हेट पार्ट कापल्याचं त्याने सांगितलं. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. हे कपल काही दिवसांपूर्वी बिहारमधून दिल्लीला आलं होतं. दोघांचं हे तिसरे लग्न होते. पीडित व्यक्ती शक्तीनगर येथील एका गेस्ट हाऊसमध्ये काम करते.
31 ऑक्टोबरला दिवाळीच्या रात्री तो दारू प्यायलाआणि मद्यधुंद अवस्थेत घरी पोहोचला. काही कारणावरून त्याचं पत्नीशी भांडण झालं. यानंतर पत्नी घर सोडून निघून गेली. काही वेळाने ती परत आली आणि धारदार शस्त्राने पतीचा प्रायव्हेट पार्ट तिनं कापला.
बडा हिंदूराव रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याला सफदरजंग रुग्णालयात पाठवण्यात आलं. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या व्यक्तीचा जबाब नुकताच नोंदवण्यात आला आहे. त्यांची स्थिती आणखी सुधारल्यानंतर अधिक माहिती समोर येईल. आरोपी महिला सध्या फरार असून तिला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.